AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND VS SA: भारताने ‘या’ पाच चुकांमुळे गमावली जोहान्सबर्ग कसोटी

वर्ल्ड क्लास गोलंदाज असलेली टीम इंडिया कुठे चुकली? तिसऱ्या दिवसापर्यंत कसोटीत आव्हान टिकवून ठेवणारी टीम इंडिया कुठे चुकली? कशामुळे टीम इंडियाने जोहान्सबर्ग कसोटी गमावली ते जाणून घेऊया.

IND VS SA:  भारताने 'या' पाच चुकांमुळे गमावली जोहान्सबर्ग कसोटी
| Edited By: | Updated on: Jan 06, 2022 | 10:02 PM
Share

जोहान्सबर्ग: सेंच्युरियन जिंकून मालिकेची दमदार सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाला जोहान्सबर्गमध्ये झटका बसला आहे. कर्णधार डीन एल्गरच्या नाबाद 96 आणि रेसी वान डर डुसेच्या 40 धावांच्या बळावर यजमानांनी टीम इंडियाला सात विकेटने हरवले. दक्षिण आफ्रिकेने अत्यंत सहजतेने भारताने दिलेले 240 धावांचे लक्ष्य पार केले. चौथ्या डावात फलंदाजी अवघड होती. पण दक्षिण आफ्रिकन फलंदाजांनी वेगवान खेळपट्ट्यांवर कशी फलंदाजी करायची ते दाखवून दिले व मालिकेत 1-1 बरोबरी साधली. (india vs South Africa India lost at johansburg because of five mistakes)

वर्ल्ड क्लास गोलंदाज असलेली टीम इंडिया कुठे चुकली? तिसऱ्या दिवसापर्यंत कसोटीत आव्हान टिकवून ठेवणारी टीम इंडिया कुठे चुकली? कशामुळे टीम इंडियाने जोहान्सबर्ग कसोटी गमावली ते जाणून घेऊया.

बुमराहची खराब गोलंदाजी कसोटीमध्ये विजयासाठी टीम इंडिया जसप्रीत बुमराहवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. पण जोहान्सबर्गमध्ये बुमराहने निराशा केली. बुमराहने विकेट घेण्याचा जास्त प्रयत्न केला. बुमराहने ऑफ स्टंम्पऐवजी विकेट घेण्याच्या प्रयत्नात पायाजवळ गोलंदाजी केली. ज्याचा दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांनी फायदा उचलला. गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर त्याने प्रति ओव्हर चार रन्स दिल्या. ही खराब कामगिरी आहे.

मोहम्मद सिराजची कमतरता जाणवली जोहान्सबर्ग कसोटीत भारताने मोहम्मद सिराजला मीस केले. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे सिराज पूर्णपणे गोलंदाजीसाठी तयार नव्हता. त्याने सामन्यात फक्त चार षटकं गोलंदाजी केली.

केएल राहुलचे चुकीचे निर्णय राहुलने कर्णधार म्हणून घेतलेले काही निर्णयही चुकले. चौथ्या डावात त्याने बचावात्मक फिल्डिंग सेट केली. ज्याचा आफ्रिकन फलंदाजांनी फायदा उचलला. फिल्डिंग अशी सेट केली होती की, सहज एकेरी-दुहेरी धावा पळून काढल्या.

कोहलीची उणीव जाणवली

कसोटी क्रिकेटमध्ये भारताच्या यशात कोहलीचा मोठा वाटा आहे. गोलंदाजांशी चर्चा करुन त्यांना विकेट काढण्यासाठी सतत प्रेरित करण्याची कोहलीची सवय आहे. तो अनुभव कमी पडला.

फलंदाजाची दमदार कामगिरी भारतापेक्षा दक्षिण आफ्रिकन फलंदाजांनी केलेली सरस फलंदाजी हे भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण आहे. एल्गर, डुसेच्या शरीरावर बॉल शेकले पण त्यांनी विकेट फेकली नाही. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 82 धावा जोडल्या. मार्कराम-एल्गरने सलामीसाठी 47 आणि कीगन पीटरसन बरोबर 46 धावांची भागीदारी केल्या. या पार्टनरशिप निर्णायक ठरल्या.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.