IND vs SA: कोच राहुल द्रविड यांनी दिनेश कार्तिकच कौतुक केल्याने ऋषभ पंतचं टेन्शन वाढलं, म्हणाले….

IND vs SA: दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) खेळाने हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) प्रभावित झाले आहेत. तब्बल 3 वर्षानंतर दिनेश कार्तिकने भारतीय संघात पुनरागमन केलय.

IND vs SA: कोच राहुल द्रविड यांनी दिनेश कार्तिकच कौतुक केल्याने ऋषभ पंतचं टेन्शन वाढलं, म्हणाले....
rishabh pant dinesh karthikImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 11:15 AM

मुंबई: दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) खेळाने हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) प्रभावित झाले आहेत. तब्बल 3 वर्षानंतर दिनेश कार्तिकने भारतीय संघात पुनरागमन केलय. राहुल द्रविड यांनी दिनेश कार्तिकच भरभरुन कौतुक केलय. या कौतुकामुळे ऋषभ पंतच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत. कार्तिकने आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये दमदार प्रदर्शन करुन भारतीय संघात स्थान मिळवलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथ्या टी 20 सामन्यात कार्तिक 27 चेंडूत 55 धावांची शानदार खेळी खेळला. महत्त्वाचं म्हणजे मोक्याच्या क्षणी संघ अडचणीत असताना, त्याने संघाला संकटातून बाहेर काढलं. दिनेश कार्तिकच कौतुक करताना राहुल द्रविड म्हणाले की, “खास स्किल्ससाठी म्हणून दिनेशची संघात निवड केली आहे. मागच्या 2-3 वर्षातील त्याची कामगिरी लक्षात घेऊन त्याला संघात निवडण्यात आलं. राजकोट मध्ये त्याने आपली निवड योग्य असल्याचं सिद्ध केलं”

पुढे जाण्यासाठी पर्याय उपलब्ध होतो

राजकोट टी 20 मध्ये एक वेळ भारताच्या चार बाद 81 धावा होत्या. त्यानंतर कार्तिकने नुसती तडाखेबंद खेळीच केली नाही, तर त्या इनिंगमुळे भारताला सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधता आली. “कार्तिक चांगला खेळतोय, हे पाहून बरं वाटलं. यामुळे आमच्यासमोर पुढे जाण्यासाठी पर्याय उपलब्ध होतो. मी मुलांना सांगत होतो की, तुम्हाला दारावरची कडी वाजवायची नाहीय, तर दरवाजा उघडायचा आहे. राजकोटच्या इनिंगचा अर्थ म्हणजे कार्तिक धमाका करतोय” असं राहुल द्रविड म्हणाले.

हे सुद्धा वाचा

ऋषभ पंतच टेन्शन कसं वाढलं ते समजून घ्या

हेड कोच राहुल द्रविड यांनी दिनेश कार्तिकची स्तुती केल्याने ऋषभ पंतच्या अडचणी वाढल्या आहेत. पंत आयपीएल पासून खराब फॉर्ममध्ये आहे. त्याच्यावर रन्स करण्याचा दबाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. त्यासाठी सर्वच खेळाडूंना आपली योग्यता सिद्ध करायची आहे. कार्तिक संदर्भात राहुल द्रविड यांनी पर्याय खुले होत असल्याचं विधान केलय. त्यामुळे ऋषभ पंतवर धावा करण्याचा दबाव आणखी वाढणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.