AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : किंग विराट कोहलीची हिटमॅनला ‘जादू की झप्पी’, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

IND vs SL Virat Kohli and Rohit Sharma : रोहितने श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाचा एक कडक कॅच घेतला. ही विकेट म्हणजे जवळपास अर्धा सामना जिंकल्यासारखा होता. या कॅचनंतर रोहित आणि विराटच्या झप्पीचा व्हिडीओ सोशल मीडियाावर व्हायरल होत आहे.

IND vs SL : किंग विराट कोहलीची हिटमॅनला 'जादू की झप्पी', सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Sep 13, 2023 | 4:40 PM
Share

मुंबई : भारत आणि श्रीलंकेमधील सामना रोमांचक झालेला पाहायला मिळाला. या सामन्यामध्ये भारतीय खेळाडंनी सर्व ताकद लावत श्रीलंकेच्या पारड्यातील सामना खेचून आणला. श्रीलंकेच्या विकेट पडत होत्या, मात्र धावा कमी असल्यामुळे त्यांच्यावर जास्त प्रमाणा दबाव दिसला नाही. शेवटला धनंजय डी सिल्वा आऊट झाला आणि सामना फिरला. 214 धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेचा संघ 172 धावांवर ऑल आऊट झाला. या विजयासह भारताने आशिया कपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. सध्या सोशल मीडियावर रोहित आणि विराटचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

रोहितची विराटला जादू की झप्पी-

रोहित शर्मा याने स्लिपमध्ये घेतलेल्या कॅच सर्वांनाच थक्क करणारा होता. रोहितने श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाचा एक कडक कॅच घेतला. ही विकेट म्हणजे जवळपास श्रीलंकेच्या पारड्यातून सामना भारताकडे झुकला होता. कोणतीही विकेट गेल्यावर सर्वात जास्त सेलिब्रेशन विराट कोहली याचं पाहण्यासारखं असतं.  रोहितने शनाकाचा दमदार झेल घेतल्यावर त्याला विराट कोहलीने जादू की झप्पी दिली.

पाहा व्हिडीओ-

रोहित-विराटची जोडी मैदानात असली आणि दोघेही सेट झाले की विरोधी संघाला ग्रहण लागल्याशिवाय राहत नाही. विराटचं फलंदाजीसोबतच फिल्डिंगमधील डेडिकेशन हे किती असतं हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. सोशल मीडियावर रोहित-विराटता झप्पीवाला व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

सामना अटीतटीचा चालू होता ज्यामध्ये भारतीय संघाला विजय मिळवणं कठीण होतं. कारण श्रीलंकेला जिंकण्यासाठी जास्त चेंडूत कमी धावांची गरज होती. त्यामुळे विकेट गेली तरी एकेरी दुहेरी धावांनी त्यांच्यावरील प्रेशर हे कमी प्रमाणात होतं. मात्र धनंजय डी सिल्वा आणि महेश तीक्ष्णा यांची विकेट गेली  अन् सामना फिरला. या विजयासह भारतीय संघाने 10 व्यांदा आशिया कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

दोन महत्त्वाच्या विकेट गेल्यावर भारतीय संघाने श्रालंकेला बॅकफूटला ढकलत सामन्यामध्ये आघाडी घेतली होती. मात्र दुसरीकडे श्रीलंकेचा युवा खेळाडू दुनिथ वेललागे याने शेवटपर्यंत भारताला मोकळा श्वास घेऊ दिला नाही.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.