AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs West Indies Today Match Weather Report: पहिल्या वनडेत पाऊस व्यत्यय आणेल का? वातावरण कसं असेल, जाणून घ्या

India vs West Indies Today Match Weather Report: चार दिवसाच्या विश्रांतीनंतर आज भारतीय संघ (Team india) पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. यावेळी जागा आणि संघ पूर्णपणे वेगळा आहे. भारतीय संघ तीन आठवडे इंग्लंड (England) मध्ये होता.

India vs West Indies Today Match Weather Report: पहिल्या वनडेत पाऊस व्यत्यय आणेल का? वातावरण कसं असेल, जाणून घ्या
ind vs wiImage Credit source: AFP
| Updated on: Jul 22, 2022 | 5:04 PM
Share

मुंबई: चार दिवसाच्या विश्रांतीनंतर आज भारतीय संघ (Team india) पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. यावेळी जागा आणि संघ पूर्णपणे वेगळा आहे. भारतीय संघ तीन आठवडे इंग्लंड (England) मध्ये होता. इंग्लंड मध्ये जय-पराजय अनुभवल्यानंतर भारतीय संघ कॅरेबियाई दौऱ्यावर आला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) मध्ये आज म्हणजे 22 जुलैपासून तीन वनडे सामन्यांची मालिका सुरु होत आहे. भारतीय संघ आधी वनडे सीरीज नंतर पाच टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

कसं आहे पोर्ट ऑफ स्पेन मध्ये वातावरण?

भारत आणि वेस्ट इंडिज मधील पहिल्या वनडे सामन्यात पाऊस व्यत्यय आणण्याची शक्यता आहे. पोर्ट ऑफ स्पेन मध्ये पहिला सामना आहे. त्रिनिदादच्या राजधानीमध्ये दोन दिवसापूर्वीच पावसाने आपलं दर्शन दिलं होतं. आज शुक्रवारी सुद्धा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. बुधवारच्या पावसाने भारत आणि वेस्ट इंडिजच्या सराव सत्रात अडथळा आणला होता. त्यामुळे दोन्ही टीम्सना इन्डोर प्रॅक्टिस करावी लागली.

पाऊस व्यत्यय आणेल का?

भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 7 वाजता सामना सुरु होणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ठरल्यावेळेला 7 वाजता सामना सुरु होईल. पण एकतासाने 8 वाजता पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. पाऊस किती वेळासाठी पडेल, हे त्यावेळीच समजेल. पाऊस त्यावेळी थांबला, तरी पुन्हा अडीच-तीन तासांनी कोसळण्याची शक्यता आहे. म्हणजे आजच्या सामन्यासाठी सामना कुठल्याही अडथळ्याविना पूर्ण व्हावा, यासाठी चाहत्यांना प्रार्थना करावी लागेल.

क्वीन्स पार्क ओव्हलवर भारताचा रेकॉर्ड

क्वीन्स पार्क ओव्हलच्या मैदानावर नेहमीच भारताचा चांगला रेकॉर्ड राहिला आहे. वेस्ट इंडिज नंतर या मैदानावर भारतानेच सर्वाधिक वनडे सामने खेळले आहेत. निम्म्यापेक्षा जास्त सामने जिंकलेही आहेत. टीम इंडिया या मैदानावर एकूण 21 वनडे सामने खेळली आहे. त्यात 11 सामने जिंकलेत, 9 सामन्यात पराभव झाला आहे. एका सामन्याचा निकाल लागला नाही.

ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....