IND vs WI: कोरोना विस्फोटामुळे टीम इंडियात ‘या’ खेळाडूला मिळाली संधी, 14 महिन्यापूर्वी खेळला होता शेवटची वनडे

BCCI ने अधिकृत स्टेटमेंट जारी करुन भारतीय संघातील चार खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील तिघांना असं एकूण सात जणांना कोरोना व्हायरसची (Corona positive) बाधा झाल्याची माहिती दिली आहे.

IND vs WI: कोरोना विस्फोटामुळे टीम इंडियात 'या' खेळाडूला मिळाली संधी, 14 महिन्यापूर्वी खेळला होता शेवटची वनडे
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 8:57 AM

अहमदाबाद: BCCI ने अधिकृत स्टेटमेंट जारी करुन भारतीय संघातील चार खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील तिघांना असं एकूण सात जणांना कोरोना व्हायरसची (Corona positive) बाधा झाल्याची माहिती दिली आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध येत्या 6 फेब्रुवारीपासून रविवारपासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेसाठी मयंक अग्रवालचा (mayank agarwal) 18 सदस्यीय संघात समावेश करण्यात आल्याची माहिती दिली आहे. भारत वेस्ट इंडिजविरुद्ध तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये वनडे आणि कोलकात्याच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर तीन टी-20 सामने होतील. टीन इंडियातील तीन क्रिकेटपटुंचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अखिल भारतीय निवड समितीने मयंक अग्रवालचा वनडे संघात समावेश केल्याची माहिती बीसीसीआयने स्टेटमेंटमधून दिली आहे.

यांना झाली कोरोनाची बाधा आगामी वनडे मालिकेसाठी संघातील सर्व खेळाडूंना 31 जानेवारीला अहमदाबाद येथे हजर होण्यास सांगण्यात आले होते. घरुन निघण्याआधी RT-PCR टेस्ट करण्यास सांगितले होते. तो रिपोर्ट निगेटिव्ह असेल, तर प्रवास ग्राह्य धरला जाणार होता. बीसीसीआयने जारी केलेल्या पत्रकामध्ये शिखर धवन, श्रेयस अय्यर आणि ऋतुराज गायकवाड आणि स्टँडबायवर असलेल्या नवदीप सैनी या चौघांना कोरोनाची बाधा झाल्याचं म्हटलं आहे. फिल्डिंग कोच टी. दिलीप, सुरक्षा लायसन अधिकारी बी लोकेश आणि स्पोटर्स मसाज थेरपीस्ट राजीव कुमार यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

पुढचे सात दिवस आयसोलेशनमध्ये सलामीवीर शिखर धवन, वेगवान गोलंदाज नवदीप सैनी यांची सोमवारी केलेली RT-PCR टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. ऋतुराज गायकवाडची मंगळवारी करण्यात आलेली चाचणी पॉझिटिव्ह ठरली आहे. श्रेयस अय्यर आणि मसाज थेरपीस्ट राजीव कुमार यांची बुधवारी केलेली चाचणी पॉझिटिव्ह आली. कोरोनाची बाधा झालेले सर्वजण पुढचे सात दिवस आयसोलेशनमध्ये राहणार आहेत. त्यामुळे त्यांना वेस्ट इंडिज विरुद्धची पहिली वनडे खेळता येणार नाहीय.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेवर कोरोनाचे सावट आहे. नियमानुसार कोविड प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करण्यात येईल. वेस्ट इंडिजचा संघ कालच अहमदाबादमध्ये दाखल झाला आहे. नुकत्याच संपलेल्या टी-20 मालिकेत त्यांनी इंग्लंडवर विजय मिळवला होता.

india vs west indies mayank agarwal added to the odi squad after indian camp players corona positive

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.