IND vs WI: सिलेक्शन झाल्यानंतरही टीम इंडियाचे दोन खेळाडू टेन्शनमध्ये, राहुल-रोहित जोडीची जबरदस्त रणनिती

संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंच योग्य संतुलन साधण्यात आलं आहे. सिलेक्शनचा हा पॅटर्न वेगळा आहे. त्यामुळे संघातील अनुभवी खेळाडूंवर चांगली कामगिरी करुन दाखवण्याचा दबाव वाढणार आहे.

IND vs WI: सिलेक्शन झाल्यानंतरही टीम इंडियाचे दोन खेळाडू टेन्शनमध्ये, राहुल-रोहित जोडीची जबरदस्त रणनिती
IND VS WI: (PC-AFP)
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 7:00 AM

मुंबई: वेस्ट इंडिज विरुद्ध येत्या सहा फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या वनडे आणि टी-20 सीरीजसाठी (India vs West Indies series) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंच योग्य संतुलन साधण्यात आलं आहे. सिलेक्शनचा हा पॅटर्न वेगळा आहे. त्यामुळे संघातील अनुभवी खेळाडूंवर चांगली कामगिरी करुन दाखवण्याचा दबाव वाढणार आहे. हेड कोच राहुल द्रविड आणि नवीन कर्णधार रोहित शर्मा यांनी बनवलेल्या नव्या रणनीतीनुळे संघातील काही खेळाडू नक्कीच टेन्शनमध्ये आले असतील. मुंबईचा श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) टीम इंडियात अनेक संधी देण्यात आल्या आहेत. पण आता त्यांच्या पर्यायांचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर दबाव वाढला आहे.

वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेसाठी मधल्याफळीत खेळणाऱ्या दीपक हुड्डाची संघात पहिल्यांदाच निवड करण्यात आली आहे. लेगस्पिनर रवी बिष्णोई सुद्धा संघाचा भाग आहे. दीपक हुड्डाला वनडे संघात स्थान मिळाल्यामुळे थेट श्रेयस अय्यरवर दबाव वाढणार आहे तसेच बिष्णोईच्या समावेशामुळे युजवेंद्र चहलवर चांगली कामगिरी करुन दाखवण्याचा दबाव असेल.

दीपक हुड्डा आणि श्रेयस अय्यरमध्ये स्पर्धा? दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये टीम इंडियाने श्रेयस अय्यरला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं. श्रेयस तिन्ही सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला. अय्यरमध्ये टॅलेंट आहे, हे सगळ्यांना माहित आहे पण श्रेयसकडून भारतीय संघाला खूप अपेक्षा आहेत. दक्षिण आफ्रिकेत श्रेयस अय्यरकडून गोलंदाजी सुद्धा करुन घेतली. मधल्याफळीत फलंदाजीबरोबरच गोलंदाजी करणारे सुद्धा खेळाडू असावेत, अशी संघाची रणनीती आहे. त्यामुळेच दीपक हुड्डाचा संघात समावेश करण्यात आला आहे. तो गोलंदाजी सुद्धा करु शकतो. दीपक हुड्डा नियमित गोलंदाज नाहीय. पण वेळ पडल्यावर तो गोलंदाजी सुद्धा करु शकतो. चौथ्या नंबरपासून सातव्या क्रमांकापर्यंत तो कुठेही फलंदाजी करु शकतो.

दोन लेगस्पिरनमध्ये स्पर्धा युजवेंद्र चहल टीम इंडियाच्या सेटअपचा भाग आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर चहलची कामगिरी समाधानकारक नव्हती. चहल आधी जसे पटापट विकेट काढायचा, आता तितक्या सहजतेने त्याला विकेट मिळत नाहीत. त्यामुळे रवी बिष्णोईचा संघात समावेश करण्यात आला आहे. बिष्णोईची गोलंदाजीची पद्धत वेगळी आहे. वेग आणि गुगली दोन्ही चहलकडे आहे. तसचं तो उत्तम क्षेत्ररक्षकही आहे. रवी बिष्णोईचा संघात समावेश, ही चहलसाठी धोक्याची घंटा आहे.

india vs west indies ravi bishnoi deepak hooda big threat for shreyas iyer yuzvendra chahal

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....