Ravi Bishnoi: अनिल कुंबळेंचा चेला, क्रिकेटसाठी वडिलांशी भांडला, शिक्षण सोडलं, अखेर टीम इंडियाचे उघडले दरवाजे

अनिल सरांकडून मी भरपूर काही शिकलो आहे. चांगला क्रिकेटपटू होण्यासाठी त्या मार्गदर्शनाचा मला भरपूर फायदा झाला.

Jan 27, 2022 | 3:18 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 27, 2022 | 3:18 PM

युवा लेगस्पिनर रवी बिष्णोईसाठी (Ravi Bishnoi) हा आठवडा स्वप्नवत आहे. IPL मधल्या लखनऊ सुपर जायंट्स फ्रेंचायजीने त्याची निवड केल्यानंतर रवी बिष्णोईची भारताच्या वनडे आणि टी-20 संघात निवड झाली आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध मायदेशात होणाऱ्या सीरीजसाठी निवड झाल्यानंतर रवीने हे सर्व स्वप्नवत वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

1 / 5
इंडियन प्रिमियर लीगमध्ये रवी बिष्णोई किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळत असताना त्याला अनिल कुंबळेने मोलाचे मार्गदर्शन केले. मैदानावर असताना, योजनांची कशी अमलबजावणी करायची, त्यावर रवीला अनिल कुंबळेंचा सल्ला आठवला. रवीने 6.95 च्या सरासरीने आयपीएलच्या 23 सामन्यात 24 विकेट घेतल्या आहेत.

2 / 5
"अनिल सरांकडून मी भरपूर काही शिकलो आहे. चांगला क्रिकेटपटू होण्यासाठी त्या मार्गदर्शनाचा मला भरपूर फायदा झाला. दबावाखाली अपेक्षा सोडू नयेत, हे मी अनिल सरांकडून शिकलो. जी माझी शक्तीस्थळ आहेत, तसाच त्यांनी मला खेळ करण्याचा सल्ला दिला. मोकळेपणाने खेळण्यासाठी त्यांनी मला आत्मविश्वास दिला" असे बिष्णोईने सांगितले.

3 / 5
 रवी बिष्णोईची आज भारतीय संघात झालेली निवड त्याची मेहनत आणि त्यागाचे फळ आहे. क्रिकेटसाठी त्याने शिक्षण सोडलं. वडिलांच्या मर्जीच्या विरोधात गेला. अनेकदा रिजेक्शन झालं. पण स्वत:वरचा विश्वास ढळू दिला नाही.

4 / 5
  वर्ष 2018 मध्ये रवीला बिष्णोईला वडिलांच्या मर्जीच्या विरोधात जावे लागले. त्यावर्षी राजस्थान रॉयल्स संघालाठी रवी नेट्समध्ये गोलंदाजी करत होता. त्याच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु होणार होत्या. मुलाने बोर्डाची परीक्षा द्यावी, अशी वडिलांची इच्छा होती. पण रवी तिथेच थांबला आणि तिथूनच त्याचं नशीब पालटायला सुरुवात झाली. रवीने अजूनपर्यंत बोर्डाची परीक्षा दिलेली नाही.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें