Team India : वर्ल्ड कप विजयानंतर आता वनडे सीरिजचा थरार, भारत 3 सामने खेळणार, पाहा वेळापत्रक

Indian Cricket Team Schedule: टीम इंडिया आयसीसी टी 20i वर्ल्ड कप विजयानंतर काही दिवस विश्रांती घेणार आहे. या निमित्ताने जाणून घ्या टीम इंडिया आपली पुढील मालिका कधी आणि कुणाविरुद्ध खेळणार?

Team India : वर्ल्ड कप विजयानंतर आता वनडे सीरिजचा थरार, भारत 3 सामने खेळणार, पाहा वेळापत्रक
Indian Cricket Team Schedule
Image Credit source: @CricketNep X Account
| Updated on: Mar 09, 2026 | 9:12 PM

टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टी 20i वर्ल्ड कप मोहिम फत्ते करुन दाखवली. भारताने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम फेरीत न्यूझीलंडला 96 धावांनी पराभूत केलं. टीम इंडियाने या स्पर्धेच्या 10 व्या पर्वात 9 पैकी 8 सामने जिंकत वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. टीम इंडियाची ही टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याची सलग दुसरी वेळ ठरली. भारताने यासह एकूण तिसऱ्यांदा आयसीसी टी 20i वर्ल्ड कप जिंकण्याचा बहुमान मिळवला. भारत अशी कामगिरी करणारा पहिलाच संघ ठरला. गेल्या महिन्याभर वर्ल्ड कप स्पर्धेनिमित्ताने क्रिकेट चाहत्यांना एकूण 20 संघांमध्ये ‘रन’संग्राम पाहायला मिळाला. मात्र आता या स्पर्धेची सांगता झाली आहे. त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांना काही दिवस चुकल्या सारखं वाटेल. या निमित्ताने टीम इंडिया आयसीसी टी 20i वर्ल्ड कप विजयानंतर कधी एक्शन मोडमध्ये दिसणार? कधी आणि कोणत्या संघाविरुद्ध आपली पुढील मालिका खेळणार? हे आपण जाणून घेऊयात.

टीम इंडिया आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील पहिल्या आणि शेवटची दिवशी खेळली. टीम इंडिया या स्पर्धेनिमित्ताने जवळपास 1 महिने एक्शन मोडमध्ये होती. आता ऐतिहासिक विजयानंतर खेळाडू काही दिवस रिलॅक्स मोडमध्ये असणार आहेत. चाहत्यांना आता टीम इंडियाला ब्लु जर्सीत पाहण्यासाठी काही महिन्यांची प्रतिक्षा करावी लागणार आहे. टीम इंडिया एकूण 96 दिवसांनंतर मैदानात उतरणार आहे.

टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध भिडणार

टीम इंडिया आता थेट 6 जूनला म्हणजे जवळपास 3 महिन्यांनंतर मैदानात उतरणार आहे. टीम इंडिया मायदेशात अफगाणिस्तान विरुद्ध भिडणार आहे. बीसीसीआयने अवघ्या काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं होतं.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यांचं वेळापत्रक

अफगाणिस्तानचा भारत दौरा 2026

अफगाणिस्तान टीम इंडिया विरुद्ध या दौऱ्यात एकदिवसीय मालिका खेळणार आहे. उभयसंघात एकूण 3 सामने होणार आहेत. त्यानंतर उभयसंघात एकमेव कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. एकदिवसीय मालिकेनिमित्ताने रोहित शर्मा आणि विराट कोहली ही टीम इंडियाची अनुभवी जोडी खेळताना दिसणार आहे. दोन्ही संघांची एकमेकांविरूद्धची ही पहिलीच एकदिवसीय मालिका असणार आहे. अफगाणिस्तानच्या या भारत दौऱ्याची सांगता एकमेव कसोटी क्रिकेट सामन्याने होणार आहे. उभयसंघातील हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील दुसराच सामना असणार आहे.

Follow Us