
भारताने श्रीलंकेचा पहिल्या सामन्यात धुव्वा उडवत विजयी सेतू बांधण्यास सुरुवात केली. भारताने 47 षटकात 8 गडी गमवून 269 धावा केल्या. पण डकवर्थ लुईस नियमानुसार भारताने श्रीलंकेसमोर 271 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान गाठणं काही श्रीलंकेला जमलं नाही. खरं तर श्रीलंकेनी केलेली सुरुवात पाहता हे आव्हान सहज गाठेल असं वाटलं होतं. पण भारताच्या रणरागिणींनी त्यांना डोकं वर काढू दिलं नाही. दीप्ती शर्मा वूमन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. दीप्तीने टीम इंडिया अडचणीत असताना अमनज्योत कौर हीच्यासोबत सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. तसेच दीप्तीने एकूण 53 धावा केल्या. तसेच दीप्तीने एकूण 3 विकेट्स घेत श्रीलंकेला गुंडाळण्यात निर्णायक भूमिका बजावली. आता भारताचा पुढचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना 5 ऑक्टोबरला होणार आहे.
श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय फसला असंच म्हणावं लागेल. टीम इंडियाला सुरुवातीला अडचणीत आणलं. पण मधल्या फळीत दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौर या दोघांनी डाव सावरत विजयाचा पूल बांधला. टीम इंडियाने 47 षटकात 8 गडी गमवून 269 धावा केल्या. पण डकवर्थ लुईस नियमानुसार श्रीलंसमोर 271 धावांचं आव्हान दिलं गेलं. हे आव्हान गाठताना श्रीलंकेने चांगली सुरुवात केली. मात्र त्यानंतर धडाधड विकेट पडल्या. श्रीलंकेने सर्व गडी गमवून 211 धावा केल्या आणि 59 दाावंनी पराभव झाला. दीप्ती शर्माने फलंदाजीनंतर गोलंदाजीतही श्रीलंकेची दाणादाण उडवून दिली. तिने 10 षटकं टाकली. त्यात एक निर्धाव षटक टाकलं आणि 54 धावा देत 3 गडी बाद केले. अमनजोत कौरनेही 6 षटक टाकली आणि 37 धावा देत गडी बाद केला.
श्रीलंकेला अचुनी कुलासुरियाच्या रुपाने नववा धक्का बसला आहे. श्री चरणीच्या गोलंदाजीवर स्मृती मंधानाने तिचा झेल पकडत तंबूचा रस्ता दाखवला.
श्रीलंकेला सुगंधिका कुमारीच्या रुपाने आठवा धक्का बसला. या विकेटसह टीम इंडिया विजयापासून 2 विकेट दूर आहे.
टीम इंडियाला आयसीसी वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत विजयी सलामी देण्यासाठी आता फक्त 3 विकेट्सची गरज आहे. टीम इंडियाने श्रीलंकेला सातवा झटका दिला आहे. स्नेह राणा हीने निलाक्षी डी सिल्वा हीला बोल्ड केलं.
टीम इंडियाने श्रीलंकेला सहावा झटका दिला आहे.दीप्ती शर्मा हीने अनुष्का संजीवनीला आपल्या बॉलिंगवर कॅप्टन हरमनप्रीत कौर हीच्या हाती कॅच आऊट केलं. अनुष्का 10 बॉलमध्ये 6 रन्स करुन आऊट झाली. तर दीप्तीने यासह तिसरी विकेट मिळवली.
टीम इंडियाने श्रीलंकेला पाचवा झटका देत विजयाचा दावा आणखी मजबूत केला आहे. दीप्ती शर्मा हीच्या बॉलिंगवर विकेटकीपर रिचा घोष हीने सुरेख कॅच घेत कविशा दिलहारी हीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. कविशाने 12 बॉलमध्ये 15 रन्स केल्या.
टीम इंडियाने श्रीलंकेला चौथा झटका दिला आहे. अमनज्योत कौर हीने विश्मी गुणरत्ने हीला एलबीड्ब्लयू आऊट केलं आहे. विश्मीने 28 बॉलमध्ये 11 रन्स केल्या. टीम इंडियाने यासह श्रीलंकेला बॅकफुटवर ढकललं आहे.
श्री चरणी हीने हर्षिता समरविक्रमा हीला एलबीडब्ल्यू आऊट करत श्रीलंकेला तिसरा झटका दिला आहे. हर्षिताने 45 बॉलमध्ये 3 फोरसह 29 रन्स केल्या. श्रीलंकेने तिसरी विकेट गमावल्यानंतर त्यांचा स्कोअर 22.3 ओव्हरनंतर 103 असा आहे.
टीम इंडिया श्रीलंकेची कॅप्टन आणि ओपनर चमारी अट्टापट्टू हीला अर्धशतक करण्यापासून रोखण्यात यशस्वी ठरली आहे. स्पिनर दीप्ती शर्मा हीने चमारीला 15 व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर क्लिन बोल्ड केलं. चमारीने 47 बॉलमध्ये 43 रन्स केल्या.
श्रीलंकेची कॅप्टन चमारी अर्धशतकाच्या दिशेने जात आहे. चमारीने 13 ओव्हरपर्यंत 37 रन्स केल्या आहेत. त्यामुळे श्रीलंकेला विजयापासून रोखायचं असेल तर चमारीला आता लवकरात लवकर आऊट करावं लागणार आहे. आता टीम इंडियाला दुसरी विकेट कोण घेऊन देणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आहे.
क्रांती गौड हीने श्रीलंकेला पहिला झटका दिला आहे. क्रांतीने 7व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर श्रीलंकेची ओपनर हसीनी परेरा हीला क्लिन बोल्ड केलं. हसीनीने 20 बॉलमध्ये 14 रन्स केल्या.
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पावरप्लेमध्ये कडक सुरुवात केली आहे. भारतीय गोलंदाजांनी चिवट बॉलिंग करत श्रीलंकेला फक्त 16 धावाच करु दिल्या. त्यामुळे आता टीम इंडियाच्या चाहत्यांना पहिल्या विकेटची प्रतिक्षा आहे.
श्रीलंकेच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेसमोर 270 धावांचं आव्हान ठेवलं आहे. श्रीलंकेकडून या धावांचा पाठलाग करण्यासाठी कॅप्टन चमारी अट्टापट्टू आणि हसीनी परेरा ही सलामी जोडी मैदानात आली आहे. तर क्रांती गौड ही पहिली ओव्हर टाकण्यासाठी सज्ज झाली आहे.
टीम इंडियाने श्रीलंकसमोर 270 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पावसामुळे 47 षटकांचा सामना खेळवण्यात आला. भारताने या 47 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 269 रन्स केल्या. टीम इंडियासाठी अमनज्योत कौर आणि दीप्ती शर्मा या दोघींनी अर्धशतकी खेळी केली. तर शेवटच्या फलंदाजांनी योगदान दिलं. त्यामुळे भारताला श्रीलंकेसमोर 270 धावांचं आव्हान ठेवता आलं.
अमनज्योत कौर हीच्यानंतर दीप्ती शर्मा हीने अर्धशतक ठोकलं आहे. दीप्ती यासह या 13 व्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत अर्धशतक करणारी टीम इंडियाची आणि एकूण दुसरी फलंदाज ठरली आहे. आता टीम इंडिया 48 ओव्हरमध्ये किती धावा करणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
श्रीलंकेने टीम इंडियाला सातवा झटका देत अमनज्योत कौर आणि दीप्ती शर्मा ही सेट जोडी फोडली आहे. अमनज्योतने उद्देशिका प्रबोधिनी हीच्या बॉलिंगवर मोठा फटका मारला. मात्र विश्मी गुणरत्ने हीने बाउंड्री लाईनवर अप्रतिम कॅच घेतला आणि अमनज्योतला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. अमनज्योतने 56 बॉलमध्ये 57 रन्स केल्या.
पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या डावात दुसऱ्यांदा खेळ थांबवावा लागला. मात्र अवघ्या काही मिनिटांनी पुन्हा एकदा खेळाला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाकडून अमनज्योत कौर आणि दीप्ती शर्मा ही जोडी मैदानात खेळत आहे.
पहिल्या डावात पावसाने दुसऱ्यांदा एन्ट्री घेतल्याने भारत-श्रीलंका यांच्यातील सामना थांबवावा लागला आहे. टीम इंडियाने 40 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 210 धावा केल्या आहेत. अमनज्योत कौर आणि दीप्ती शर्मा या दोघांनी खेळ थांबेपर्यंत सातव्या विकेटसाठी नॉट आऊट 86 रन्सची पार्टनरशीप केली आहे. अमनज्योतने 50 आणि दीप्ती शर्मा 37 धावांवर नाबाद आहेत.
अमनज्योत कौर आयसीसी वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत अर्धशतक करणारी पहिला फलंदाज ठरली आहे. अमनज्योतने अवघ्या 45 चेंडूत टीम इंडिया अडचणीत असताना ही खेळी केली. या दरम्यान दीप्ती शर्माने अमनज्योतला चांगली साथ दिली. या जोडीच्या नाबाद भागीदारीमुळे भारताला 200 पार मजल मारता आली.
टीम इंडियाने स्मृती मंधानाच्या रुपात पहिली विकेट लवकर गमावली. त्यानंतर हर्लिन देओल आणि प्रतिका रावल या जोडीने अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर प्रतिका रावल आऊट झाली. त्यानंतर श्रीलंकेने टीम इंडियाला 5 धावांच्या मोबदल्यात 4 झटके देत बॅकफुटवर ढकललंं. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली. मात्र आता अमनज्योत कौर आणि दीप्ती शर्मा या जोडीने टीम इंडियाचा डाव सावरला आहे. त्यामुळे या जोडीवर मोठी जबाबदारी आहे.
श्रीलंकेने सामन्यात जोरदार कमबॅक करत टीम इंडियाला बॅकफुटवर ढकललं आहे. श्रीलंकेेने टीम इंडियाला 5 धावात 4 झटके दिले आहेत. इनोका रनवीरा हीने टीम इंडियाला एकाच ओव्हरमध्ये 3 झटके दिले. त्यानंतर कॅप्टन चमारी अट्टापट्टू हीने रिचा घोष हीला आऊट करत भारताला सहावा झटका दिला. त्यामुळे टीम इंडियाची 6 आऊट 124 अशी स्थिती झाली आहे.
श्रीलंकेची फिरकीपटू इनोका रनिवीका हीने एका ओव्हरमध्ये सामन्याचं चित्रच बदलून टाकलं आहे. इनोकाने टीम इंडियाला डावातील 26 व्या ओव्हरमध्ये 3 झटके देत बॅकफुटवर ढकललं आहे. इनोकाने या ओव्हरमध्ये हर्लीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्स आणि कॅप्टन हरमनप्रीत कौर या तिघींना आऊट केलं. त्यामुळे टीम इंडियाची 5 आऊट 121 अशी स्थिती झाली आहे.
श्रीलंकेने प्रतिका रावल आणि हर्लीन देओल जोडी फोडली आहे. टीम इंडियाने दुसरी विकेट गमावली आहे. टीम इंडियाने स्मृती मंधाना हीच्या रुपात 14 धावांवर पहिली विकेट गमावली होती. त्यानंतर या जोडीने संयमी खेळी करुन भारताचा डाव सावरला होता. मात्र श्रीलंकेला ही जोडी फोडण्यात यश आलं. इनोका रनवीरा हीने प्रतिका रावल हीला आऊट केलं. प्रतिकाने 59 बॉलमध्ये 37 रन्स केल्या. भारताने 81 धावांवर दुसरी विकेट गमावली.
पावसाच्या व्यत्ययानंतर सामन्याला पुन्हा संध्याकाळी 5 पासून पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. पावसामुळे जवळपास एक तासाचा खेळ वाया गेला. त्यामुळे 2 ओव्हर कट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे 48 ओव्हरचा सामना होणार आहे. टीम इंडियाने पावसामुळे खेळ थांबला तोवर 1 विकेट गमावून 10 ओव्हरमध्ये 43 धावा केल्या होत्या. प्रतिका रावल आणि हर्लिन देओल ही जोडी खेळत आहे.
पावसामुळे टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात 50 सामन्यांचा सामना होणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. पावसामुळे जवळपास 1 तासाच खेळ वाया गेला आहे. त्यामुळे सामन्यातील 2 ओव्हर कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता 50 ऐवजी 48 षटकांचा सामना होणार आहे. बीसीसीआयने याबाबतची माहिती दिली आहे.
बीसीसीआयकडून सामन्याबाबत मोठी अपडेट
UPDATE: Play to resume at 5 PM IST.
The match is reduced to 48 overs a side.
Scorecard ▶️ https://t.co/m1N52FKTWT#TeamIndia | #WomenInBlue | #CWC25 https://t.co/8KI3N9Y75R
— BCCI Women (@BCCIWomen) September 30, 2025
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका सामन्याला थोड्याच वेळात पुन्हा सुरुवात होणार आहे. सामन्याला दुपारी 4 वाजून 35 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवावा लागला होता.
रायगड जिल्ह्यातील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होत आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होत आहे. प्रमुख नेते नवाब मलिक , सूरज चव्हाण आनंद परांजपे आदी नेते उपस्थित.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना पावसामुळे थांबवावा लागला आहे. टीम इंडियाने पाऊस सुरु होण्याआधी 10 ओव्हरमध्ये 1 विकेट्स गमावून 43 धावा केल्या आहेत. प्रतिका 18 आणि हर्लिन देओल 15 धावांवर नाबाद आहेत.
प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना ही सलामी जोडी टीम इंडियाला चांगली सुरुवात करुन देण्यात अपयशी ठरली. श्रीलंकेने टीम इंडियाला 14 धावांवर पहिला झटका दिला. उद्देशिका प्रबोधिनी हीने स्मृती मंधानाला 8 धावांवर आऊट केलं. त्यानंतर आता प्रतिका आणि हर्लिन देओल या जोडीवर टीम इंडियाला चांगली सुरुवात करुन देण्याचं आव्हान आहे.
टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 8 ओव्हरनंतर 1 विकेट गमावून 36 रन्स केल्या आहेत. प्रतिका रावल 15 आणि हर्लिन देओल 13 धावांवर नाबाद खेळत आहेत. तर स्मृती मंधाना 8 धावा करुन बाद झाली
श्रीलंकेने टीम इंडियाला पहिला झटका दिला आहे. पहिल्याच सामन्यात टीम इंडियाची ओपनर स्मृती मंधाना हीने निराशा केली आहे. स्मृती मंधाना हीने मोठ्या फटका मारण्याच्या नादात आपली विकेट गमावली. स्मृतीने 10 बॉलमध्ये 2 फोरसह 8 रन्स केल्या.
सोलापूरातील सीना नदीच्या पुरामुळे करमाळा तालुक्यातील खडकी गावातील खरात वस्ती येथील 29 ते 30 घरे पाण्याखाली गेली होती.पाणी ओसरल्यानंतर आता घरातील साहित्याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
आयसीसी वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. सलामीच्या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून भारताला फलंदाजीसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडियाकडून प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : चमारी अथापथु (कॅप्टन), हसिनी परेरा, हर्षिता समरविक्रम, विश्मी गुणरत्ने, कविशा दिलहरी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी(विकेटकीपर), अचीनी कुलसूरिया, सुगंधिका कुमारी, उदेशिका प्रबोधनी आणि इनोका रणवीरा.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : प्रतिका रावल, स्मृती मंधाना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, स्नेह राणा, क्रांती गौड आणि श्री चरणी.
आयसीसी वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील पहिल्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका आमनेसामने आहेत. या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात श्रीलंकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. चमारी अथापटू हीने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका सामन्याने वूमन्स आयसीसी वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेला सुरुवात होत आहे. सलामीच्या सामन्यनाला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता टॉस होणार आहे. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. अवघ्या काही मिनिटांआधी दोन्ही संघांचे खेळाडू हॉटेलमधून स्टेडियममध्ये दाखल झाले आहेत.
भारत विरुद्ध श्रीलंका सामन्याला रात्री 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण 35 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने या 35 तब्बल 31 सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेला फक्त 3 वेळा विजयी होता आलं आहे. तर उभयसंघातील 1 सामन्याचा निकाल लागू शकला नाही. उभयसंघातील आकडेवारी पाहता टीम इंडिया विजयी सुरुवात करणार असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
हसिनी परेरा, विश्मी गुणरत्ने, चमारी अथापथु (कॅप्टन), हर्षिता समरविक्रमा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), कविशा दिलहरी, देउमी विहंगा, अचिनी कुलसूरिया, उदेशिका प्रबोधनी, पियुमी वथ्सला बादलगे, मलकी मदारा, इनोका रणवीरा, निलाक्षी डी सिल्वा, सुगंधिका कुमारी आणि इमेषा दुलानी.
प्रतिका रावल, स्मृती मंधाना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कॅप्टन), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, स्नेह राणा, राधा यादव, क्रांती गौड, रेणुका सिंह ठाकूर, अरुंधती रेड्डी, अमनजोत कौर, उमा चेत्री आणि श्री चरणी.
टीम इंडियाची महिला ब्रिगेड आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया या स्पर्धेतील पहिल्याच दिवशी श्रीलंकेविरुद्ध भिडणार आहे. हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात टीम इंडिया या स्पर्धेत खेळणार आहे. टीम इंडिया श्रीलंकेला पराभूत करत विजयी सलामी देणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं बारीक लक्ष असणार आहे.