IND vs ENG : भारताचा नवखा गोलंदाज, 74 धावा देत 7 विकेट, 24 वर्षांनंतर लॉर्ड्सवर विजय

| Updated on: Jul 21, 2021 | 9:22 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यात 4 ऑगस्टपासून 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला इंग्लंडच्या नॉटिंगहॅम मैदानात सुरुवात होणार आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी सज्ज झाले असून आपले खेळाडूही जाहीर केले आहेत.

IND vs ENG : भारताचा नवखा गोलंदाज, 74 धावा देत 7 विकेट, 24 वर्षांनंतर लॉर्ड्सवर विजय
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 2014 मधील सामन्यातील एक क्षण
Follow us on

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात क्रिकेट मैदानातील स्पर्धा ही पूर्वीपासून अगदी चुरशीची होत येत आहे. मग तो गांगुलीचा शर्ट काढून फ्लिंटॉफला दिलेलं  प्रत्युत्तर असो किंवा युवराजचे स्टुवर्ट ब्रॉडला ठोकलेले सहा सिक्स असो. अनेक वर्षांपासून या संघात मैदानात काही असे किस्से घडले आहेत जेणेकरुन या संघातील सामने सर्वांनाच लक्षात राहिले आहेत. आता लवकरच हे दोन्ही संघ 4 ऑगस्टपासून इंग्लंडमध्ये 5 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी एकमेकांशी भिडणार आहेत. पण याआधी आजच्याच दिवशी 2014 मध्ये झालेल्या एका सामन्याबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे. जेव्हा एका नवख्या गोलंदाजाने इंग्लंडच्या फलंदाजाना सळो की पळो करत भारताला विजय मिळवून दिला होता.

हा सामना 17 जुलै ते 21 जुलै दरम्यान क्रिकेटची पंढरी म्हणवल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर खेळवला गेला होता. ज्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत अजिंक्य रहाणेच्या शतकाच्या जोरावर 295 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडने  प्रत्युत्तरात 319 धावा करत भारताला 24 धावांची लीड दिली. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात 342 धावा ठोकत इंग्लंडसमोर विजयासाठी 318 धावांचे लक्ष्य ठेवले. ज्याचा पाठलाग करताना  इंग्लंडचा संघ 223 धावांत सर्वबाद झाला आणि भारत 95 धावांनी सामना जिकंला. पण दुसऱ्या डावांत इंग्लंडला अवघ्या 223 धावांत सर्वबाद करण्यात एकहाती झुंज दिली होती. त्यावेळी संघात नवखा खेळाडू असणाऱ्या इशांत शर्माने (Ishant Sharma). पहिल्या डावात एकही विकेट न घेतलेल्या इशांतने दुसऱ्या डावात उत्कृष्ठ गोलंदाजी करत केवळ 74 धावांच्या बदल्यात तब्बल 7 विकेट घेतले. या विजयासह भारताने लॉर्ड्सवर देखील 1986 नंतर पहिलाच कसोटी विजय मिळवला होता.

आतुरता कसोटी मालिकेची

आता भारत आणि इंग्लंड हे पुन्हा आमने सामने भिडणार आहेत. 4 ऑगस्टपासून इंग्लंडच्या नॉटिंगहॅम मैदानात सुरु होणाऱ्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी दोन्ही संघानी आपले संघ देखील जाहीर केले आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 23 (ICC WTC 23) मधील ही पहिलीच मालिका असल्याने स्पर्धेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ जीवाचे रान करणार हे नक्की!

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट

दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट

तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट

चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर

पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.

भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव. केएल राहुल आणि वृद्धिमान साहा

राखीव खेळाडू : अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अर्जान नाग्वासवाला.

इंग्लंडचा संघ –

जो रूट (कप्तान), जोस बटलर, जॅक लीच, ऑली पोप, जॅक क्रॉली, जेम्स एंडरसन, डॉम बेस, सॅम करन, ऑली रॉबिनसन, हसीब हमीद, डॉम सिबले, डॅन लॉरेंस, बेन स्टोक्स, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, मार्क वुड.

हे ही वाचा

IND vs ENG : भारताविरुद्ध मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, चार दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन

IND vs ENG : दिलासादायक! ऋषभ पंतचा कोरोना अहवाल निगेटिव्ह, लवकरच टीम इंडियात पुनरागमन

CSXI vs IND, Other Test Live Streaming: विराटची टोळी खेळणार पहिला सराव सामना, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?

(India won with 95 runs against england in 2014 on this day with ishants awsome balling performence)