IND vs SL : भारताकडून पराभवानंतर दिग्गज श्रीलंकन क्रिकेटपटू मुरलीथरन नाराज, म्हणाला…

भारताविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात एका वेळेस श्रीलंकेचा संघ चांगल्या स्थितीत दिसत होता. पण सातव्या क्रमांकावर आलेल्या दीपकने संपूर्ण खेळच बदलत सामना फिरवला. ज्यामुळे श्रीलंकन क्रिकेटप्रेमी कमालीचे नाराज झाले.

IND vs SL : भारताकडून पराभवानंतर दिग्गज श्रीलंकन क्रिकेटपटू मुरलीथरन नाराज, म्हणाला...
मुथय्या मुरलीथरन

मुंबई : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने मालिकाही श्रीलंकेच्या हातातून निसटली आहे. या पराभवानंतर श्रीलंका संघाचा माजी क्रिकेटपटू आणि जगातील महान फिरकीपटू मुथय्या मुरलीथरन (Muttiah Muralitharan) नाराज झाला आहे. ‘श्रीलंका क्रिकेट टीम (Sri Lanka Cricket Team)  जिंकणच विसरली आहे.’ अशी प्रतिक्रियाही त्याने दिली आहे. तसेच श्रीलंका क्रिकेट कठीण काळातून जात असल्याची प्रतिक्रियाही त्याने दिली.

श्रीलंका संघ मंगळावारी (20 जुलै) भारताविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना खेळताना प्रथम फलंदाजी करत होता. यावेळी 275 धावा स्कोर बोर्डवर लावत श्रीलंका संघाने एक आव्हानात्मक लक्ष्य भारतासमोर ठेवले. ज्याचा पाठलाग करताना भारताचे 193 धावांवर सात गडी तंबूत परतले होते. पण तिथून गोलंदाज दीपक चहरने उपकर्णधार भुवनेश्वरच्या मदतीने नाबाद 69 धावा ठोकत विजय 3 विकेट्सनी विजय मिळवला. या विजयासह मालिकेतही 2-0 ने विजयी आघा़डी घेतली असून शेवटची मॅच 23 जुलैला खेळवली जाईल. दरम्यान सामन्यानंतर ESPNCricinfo शी बोलताना मुरलीथरन म्हणाला, ”मी आधाही सांगितलं होतं सध्याच्या श्रीलंका संघाला जिंकण्याचा मार्गच माहित नाही. मागील काही वर्षांत हा संघ जिंकणच विसरला आहे. मी आधीच सांगितले होते श्रीलंका पहिल्या 10 ते 15 ओव्हरमध्ये तीन विकेट्स घेईल तर भारताला अडचण होईल आणि तसंच झालं. पण त्यानंतर दीपक आणि भुवनेश्वरला गोलंदाजी करताना अनेक चुका केल्याने सामना श्रीलंकेच्या हातातून गेला.”

श्रीलंकेन प्रशिक्षकाचा मैदानातच थयथयाट

या पराभवानंतर श्रीलंकेचे कोच मिकी ऑर्थर (Mickey Arthur) चांगलेच नाराज आले. भारताच्या प्रत्येक विकेटनंतर कोच मिकी ऑर्थर हुरळून जात होते. मात्र भारताच्या विजयानंतर त्यांचा चेहराच उतरला. पराभवामुळे लालबुंद झालेले कोच ऑर्थर हे भर मैदानातच श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाशी (Dasun Shanaka) भिडले. दोघांच्या बाचाबाचीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मिकी ऑर्थर आणि दासुन शनाका हे एकमेकांशी हुज्जत घालताना दिसत आहेत. ऑर्थर हे कर्णधार शनाकाला काहीतरी जाब विचारत आहे असं दिसत आहे. मात्र शनाका त्यांना समजावत आहे. मात्र तणतण करत ऑर्थर हे मैदानाबाहेर गेले.

हे ही वाचा :

IND vs SL : श्रीलंकेला नमवत टीम इंडियाने बनवला वर्ल्ड रेकॉर्ड, ऑस्ट्रेलियाला टाकलं मागे

IND vs SL : 2021 मध्ये 2017 प्रमाणेच भारताचा रोमहर्षक विजय, तोच संघ, तोच खेळाडू, वाचा सुंदर योगायोग

दीपक चहर-सूर्यकुमारची अर्धशतकं, चुरशीच्या सामन्यात भारताची श्रीलंकेवर 3 विकेट्सने मात, मालिका भारताच्या खिशात

(Sri lankan Cricketer Muttiah Muralitharan says Sri lanka team forgets how to win after loosing saverel times)