AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Icc World Cup 2023 | टीम इंडियाची आतापर्यंतची वर्ल्ड कपमधील कामगिरी, वेळापत्रक आणि सर्वकाही

Icc World Cup 2023 Indian Cricket Team | टीम इंडियाने कपिल देव आणि महेंद्रसिंह धोनी या 2 दिग्गज कर्णधारांच्या नेतृत्वात वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केलीय. मात्र या शिवाय 10 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने कशी कामगिरी केली होती?

Icc World Cup 2023 | टीम इंडियाची आतापर्यंतची वर्ल्ड कपमधील कामगिरी, वेळापत्रक आणि सर्वकाही
आयसीसी वनडे वर्ल्ड कप इतिहासात मोठा योगायोग जुळून आला आहे. वर्ल्ड कपमध्ये 8 वर्षांनी हा योगायोग जुळलाय.
| Updated on: Oct 02, 2023 | 10:26 PM
Share

मुंबई | यजमान टीम इंडिया आयसीसी वनडे वर्ल्ड कपमधील पहिला सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना हा 8 ऑक्टोबरला चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडिया सध्या आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानी आहे. टीम इंडिया वर्ल्ड कप विजयाची प्रबळ दावेदार आहे. टीम इंडियाचा रोहित शर्मा याच्या नेतृत्वात वर्ल्ड कप खेळायला उतरणार आहे. टीम इंडियाला 2013 पासून एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. त्यामुळे यंदा रोहितच्या नेतृत्वात टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार आहे.

भारतात 2011 नंतर पहिल्यांदा वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलंय. वर्ल्ड कप 2011 चं यजमानपद हे श्रीलंका, बांगलादेश आणि भारताकडे होतं. मात्र यंदा पहिल्यांदाच पूर्णपणे वर्ल्ड कपमधील सर्व सामने हे भारतात होणार आहेत. एकूण 45 दिवसात 48 सामने हे 10 ठिकाणी होणार आहेत. हा 13 वा वनडे वर्ल्ड कप आहे. या वर्ल्ड कप निमित्ताने टीम इंडियाची आतापर्यंतच्या 12 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची कामगिरी कशी राहिलीय, हे आपण जाणून घेऊयात.

वर्ल्ड कप स्पर्धेला 1975 पासून सुरुवात झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत टीम इंडियाला फक्त 2 वेळा वर्ल्ड कप जिंकता आला आहे. तर एकदा टीम इंडियाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलंय. टीम इंडिया 4 वेळा सेमी फायनलमध्ये पराभूत झालीय. तर 7 वेळा टीम इंडियाला बाद फेरीतही पोहचता आलेलं नाही. टीम इंडियाने 1983 आणि 2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केलीय. तसेच 1987, 1996, 2015 आणि 2019 साली सेमी फायनलपर्यंत मजल मारली.

वर्ल्ड कप आणि टीम इंडियाचा प्रवास

1975 – साखळी फेरी.

1979 – साखळी फेरी.

1983 – विश्व विजेता.

1987 – सेमी फायनल.

1992 – (राउंड रॉबिन).

1996 – सेमी फायनल.

1999 – सुपर 6.

2003 – ऑस्ट्रेलिया विरुद्ध अंतिम सामन्यात अपयशी

2007 – साखळी फेरीतून पत्ता कट (बांगलादेश विरुद्धचा जिव्हारी लागणारा पराभव)

2011 – 28 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण

2015 – सेमी फायनलमध्ये बाजार उठला

2019 – न्यूझीलंड विरुद्ध महेंद्रसिंह धोनी रन आऊट आणि टीम इंडियाचं सेमी फायलनमध्ये पॅकअप.

आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...