Good News : हरभजन सिंगच्या घरी नवा पाहुणा, दुसऱ्यांदा झाला पिता, इन्स्टाग्रामवरुन दिली आनंदाची बातमी

हरभजन सिंग आणि अभिनेत्री गीता बसरा यांनी 2015 मध्ये लग्न केलं होते. त्यांना आधी एक मुलगी असून त्यांनी आता आणकी एका बाळाला जन्म दिला आहे.

Good News : हरभजन सिंगच्या घरी नवा पाहुणा, दुसऱ्यांदा झाला पिता, इन्स्टाग्रामवरुन दिली आनंदाची बातमी
हरभजन सिंग फॅमिलीसोबत

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटमधील एक दिग्गज फिरकीपटू असणाऱ्या हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि त्याची पत्नी अभिनेत्री गीता बसरा (Geeta basra) यांच्या घरी एक नवा पाहुणा आला आहे. दोघेही दुसऱ्यांदा माता-पिता झाले असून त्यांनी नुकताच एका मुलाला जन्म दिला. याआधी दोघांना एक मुलगी आहे. हरभजनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. हरभजनने पोस्टमध्ये मुलगा आणि बायको दोघेही सुखरुप असल्याची माहिती दिली असून कॅप्शनमध्ये देवाचे धन्यवादही मानले आहेत.

हरभजनने लिहिलं आहे, “आम्ही देवाला धन्यवाद करतो की आम्हाला एक स्वस्थ मुलाच्या रुपात आशीर्वाद दिले आहेत. गीता आणि मुलगा दोघेही सुखरुप आहेत. आम्ही दोघेही अत्यंत आनंदी असून सर्व शुभचिंतकाचे त्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि आशीर्वादाबद्द आभार मानतो.” गीता आणि हरभजन यांचे 29 ऑक्टोबर 2015 रोजी लग्न झाले होते. 2016 मध्ये त्यांनी एका मुलीला जन्म दिला होता. तिचे नाव त्यांनी हिनाया असं ठेवलं होतं.

सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस

हरभजन सिंगच्या पोस्टवर अनेक चाहते शुभेच्छा देत असून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. सध्या श्रीलंका दौऱ्य़ावर भारतीय संघाचा कर्णधार असणाऱ्या शिखर धवन (Shikhar Dhawan) याने देखील हरभजनला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने  लिहिलं आहे की,“पाजी बहुत मुबारकां.” शिखरसह अनेकांनी हरभजन आणि गीताला शुभेच्छा दिल्या आहेत.

हे ही वाचा :

Birthday Special : जन्मानंतर रुग्णालयातच बदली झाला, पुढे जाऊन जगातील महान फलंदाज बनत गोलंदाजाचा कर्दनकाळ ठरला, 4 सामन्यांत 774 धावा ठोकणारा भारतीय क्रिकेटपटू

Happy Birthday Sunil Gavaskar : वीरेंद्र सेहवागच्या गावस्करांना हटके शुभेच्छा, मजेशीर व्हिडीओ केला पोस्ट

IND vs ENG Women : भारतीय महिला यष्टीरक्षकाने दाखवला ‘धोनी अवतार’, क्षणार्धात इंग्लंडच्या फलंदाजाला केलं बाद, पाहा Video

(Indian Cricketer Harbhajan Singh and Geeta Basra Blessed with Baby Boy Become Parents Second Time)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI