AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : इंग्लंडमध्ये भारतीय खेळाडूंचं दमदार प्रदर्शन सुरु, ऋषभ पंत पाडतोय षटकारांचा पाऊस

भारत न्यूझीलंड विरोधात 18 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. त्याआधी कसून सरावाला भारतीय संघाने सुरुवात केली आहे.

Video : इंग्लंडमध्ये भारतीय खेळाडूंचं दमदार प्रदर्शन सुरु, ऋषभ पंत पाडतोय षटकारांचा पाऊस
indian test cricket team
| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 1:59 PM
Share

साऊदम्पटन : भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final) अंतिम सामन्यात न्यूझीलंडला धोबीपछाड करण्यासाठी सज्ज झाला आहे. यासाठी खेळाडू मैदानावर सराव करुन घाम गाळत आहे. आधी विलगीकरणात असल्याने स्वतंत्र सराव करणारे खेळाडू विलगीकरणाचा कालावधी संपल्याने मैदानात उतरुन सामुहिक सराव करत आहेत. या सरावाची झलक दाखवणारा एक व्हिडीओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. (Indian Team Started Practiceing Hard in England For WTC Final Against New Zealand)

बीसीसीआयने पोस्ट केलेल्या या सामुहिक सरावाच्या व्हिडीओला कॅप्शन ही दिलं कॅप्शनमध्ये बीसीसीसीआय लिहित की, ‘आम्ही सामुहिक सरावाला सुरुवात केली असून सरावादरम्यान सर्व खेळाडूंचा जोश अप्रतिम आहे. संपूर्ण सराव पूर्ण जोमात सुरु आहे.’

काय आहे व्हिडीओ?

या व्हिडीओमध्ये सर्व खेळाडू मैदानात नेट प्रॅक्टिस करत आहेत. ज्यात विराट कोहली(Virat KOhli), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara), रोहित शर्मा (Rohit Sharma), रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja), ऋषभ पंत (Rishabh Pant), केएल राहुल (Kl Rahuk), शुभमन गिल (Shubhman Gill) हे सर्व फलंदाजी करताना दिसत आहेत. सर्वच फलंदाज रंगात आले असून पंत मात्र एकामागोमाग एक मोठे शॉट खेळताना दिसत आहे. तिकडे गोलंदाजीमध्ये मोहम्मद सिराज (Mohammad Siraj), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), आर अश्विन (R Ashwin), इशांत शर्मा (Ishant Sharma) नेट बोलिंग करत आहेत. संघाचे मुख्य प्रशिश्रक रवी शास्त्री (Ravi Shastri) यावेळी सरावावर लक्ष देताना दिसून येत आहेत.

भारताला जपून खेळणं गरजेच

भारत मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये न्यूझीलंडशी भिडला होता. त्यावेळी न्यूझीलंडच्या दौऱ्यातील दोन्ही कसोटी सामने भारत पराभूत झाला होता. वेलिंग्टनच्या पहिल्या टेस्टमध्ये 10 विकेट्सने आणि  ख्राइस्टचर्च येथील दूसऱ्या टेस्टमध्ये 7 विकेट्सने भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे अंतिम सामन्यात भारतीय संघाला चांगल्या खेळाचे प्रदर्शन करुन विजय मिळवावा लागेल.

हे ही वाचा :

या अंपायरने अंपायरींग केली की टीम इंडिया मॅच हरतेच, WTC फायनलसाठी ICC कडून ‘या’ अंपायरची घोषणा!

WTC Final : न्यूझीलंडला हरवून 17 वर्षांपूर्वीचा लाजीरवाणा रेकॉर्ड तोडण्याची टीम इंडियाला संधी! विराट मैदान मारणार?

WTC Final : ‘हे’ दोन खेळाडू करु शकतात कमाल, माजी भारतीय क्रिकेटपटूची भविष्यवाणी

(Indian Team Started Practiceing Hard in England For WTC Final Against New Zealand)

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.