IND vs ENG : दिलासादायक! ऋषभ पंतचा कोरोना अहवाल निगेटिव्ह, लवकरच टीम इंडियात पुनरागमन

| Updated on: Jul 20, 2021 | 11:24 AM

ऋषभ पंतला 8 जुलैला कोरोनाची बाधा झाली होती. त्याचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आल्यानंतर त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले होते. आता त्याचा विलगीकरण कालावधीही संपला आहे.

IND vs ENG : दिलासादायक! ऋषभ पंतचा कोरोना अहवाल निगेटिव्ह, लवकरच टीम इंडियात पुनरागमन
ऋषभ पंत
Follow us on

लंडन : इंग्लंडच्या दौऱ्यावर असणारा भारतीय संघ (Indian Cricket Team) आज सराव सामना म्हणून काउंटी टीम बरोबर डरहम येथे कसोटी सामना खेळणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वीच भारतीय संघासाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारताचा यष्टीरक्षत फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) कोरोनामुक्त झाला असून लवकरच तो संघासोबत सरावात सामिल होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

पंतला 8 जुलैला कोरोनाची बाधा झाली होती. त्याला एसिम्पटोमेटिक लक्षण होते. सुरक्षेचा उपाय म्हणून तो विलगीकरणात होता आणि आता त्याचा विलगीकरण कालावधी रविवारी संपला असून त्याचा कोरोना अहवालही  निगेटिव्ह आला आहे. InsideSport.co यांनी दिलेल्या माहितीनुसार पंत 22 जुलैपर्यंत भारतीय संघात पुन्हा सामिल होऊ शकतो. त्यामुळे दुसऱ्या सराव सामन्यत पंत मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे. 28 जुलैपासून दुसरा सराव सामना खेळवला जाणार आहे.

आज सराव सामन्याला सुरुवात

भारत आणि इंग्लंडच्या काउंटी टीममध्ये आज (20 जुलै) पहिला सराव सामना खेळवला जाणार आहे. सुट्टीवरुन परतलेला भारतीय संघ डरहममध्ये या सामन्यासाठी एकत्र आला आहे. मात्र याआधीच पंतचा कोरोना रिपोर्ट पॉजिटिव्ह आल्याने तो संघासोबत डरहमला आलेला नाही. एका नातेवाईकाच्या घरीच पंत विलगीकरणात होता. पण रविवारी त्याचा विलगीकरण कालावधी संपल्यामुळे तो लवकरच संघात सरावासाठी सामिल होईल.

साहा, भरत अरूण अजूनही विलगीकरणात

ऋषभ पंतसोबत संघाचे थ्रो डाउन स्पेशलिस्ट दयानंद हे देखील कोरोनाबाधित आढळले होते. त्यांच्या संपर्कात 3 आणि सदस्य अभिमन्यु ईश्वरन, ऋद्दिमान साहा आणि बोलिंग कोच भरत अरूण आले असल्याने या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यांचा विलगीकरण कालावधी अजून संपला नसून 24 जुलैला संपू शकतो अशी माहितीही समोर येत आहे.

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट

दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट

तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट

चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर

पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.

अशी आहे टीम इंडिया :

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव. केएल राहुल आणि वृद्धिमान साहा

राखीव खेळाडू : अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अर्जान नाग्वासवाला.

हे ही वाचा

India vs Sri Lanka, 2nd ODI live streaming: भारत विरुद्ध श्रीलंका, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?

भारतीय संघावर कोरोनाचा घाला, पंत पाठोपाठ आणखी एकाला कोरोनाची बाधा, तर तिघेजण विलगीकरणात

ऋषभ पंतच्या कोरोनाबाधित होण्यामागील सत्य आलं समोर, Euro सामना नाही, तर ‘या’ ठिकाणी झाली कोरोनाची बाधा

(Indian Wicketkeeper Rishabh Pants Quarantine ended he will join team before 2nd Practice match)