AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑस्ट्रेलियाच्या ‘विराट कोहली’वर संक्रांत, IPL कारकिर्दीला ग्रहण? कोट्यवधीच्या बाजारात एक पैसा इज्जतीसाठी का तरसला?

एक काळ होता जेव्हा इंडियन प्रीमियर लीगमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा (Australian Players) वरचष्मा पाहायला मिळत होता. याआधीच्या आयपीएल स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला आहे. परंतु आयपीएल-2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL-2022 Mega Auction) असे झाले नाही. ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी बोली लावण्याऐवजी फ्रँचायझींनी भारतातील खेळाडूंवर पैसे उधळले.

ऑस्ट्रेलियाच्या 'विराट कोहली'वर संक्रांत, IPL कारकिर्दीला ग्रहण? कोट्यवधीच्या बाजारात एक पैसा इज्जतीसाठी का तरसला?
ipl
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Feb 14, 2022 | 5:12 PM
Share

मुंबई : एक काळ होता जेव्हा इंडियन प्रीमियर लीगमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा (Australian Players) वरचष्मा पाहायला मिळत होता. याआधीच्या आयपीएल स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला आहे. परंतु आयपीएल-2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL-2022 Mega Auction) असे झाले नाही. ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी बोली लावण्याऐवजी फ्रँचायझींनी भारतातील खेळाडूंवर पैसे उधळले. याचा परिणाम असा झाला की स्टीव्ह स्मिथ (Steve Smith), अॅडम झाम्पा, अॅरॉन फिंचसारखे खेळाडू विकले जाऊ शकले नाहीत. आयपीएलमध्ये यावेळी एकूण 11 ऑस्ट्रेलियन खेळाडू विकले गेले. यानंतर आयपीएलच्या आगामी हंगामात सहभागी होणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंची एकूण संख्या 13 झाली आहे.

स्टीव्ह स्मिथ राजस्थान रॉयल्सचा कर्णधारही राहिला आहे. राजस्थानपूर्वी तो रायझिंगने पुणे सुपरजायंट्सचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वात पुण्याचा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र यावेळी त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. अॅडम झाम्पा देखील त्याच्या लेग स्पिनने प्रभाव पाडू शकतो परंतु यावेळी फ्रँचायझींनी त्याच्यामध्ये रस दाखवला नाही.

किंमती घटल्या

दोन दिवसांच्या महालिलावात विकल्या गेल्या सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडूंना एकूण 59.7 कोटी रुपये मिळाले आहेत. एका बाजूला ऑस्ट्रेलियन खेळाडू विकले गेले नाहीत, तर दुसऱ्या बाजूला जे कांगारु विकले गेले त्यांच्या किंमतीदेखील घटल्या आहेत. डेव्हिड वॉर्नरची गणना आयपीएलमधल्या यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. तो पूर्वी सनरायझर्स हैदराबाद सोबत होता. या फ्रँचायझीकडून त्याला 12.5 कोटी रुपये मिळत होते. पण यावेळी वॉर्नरला दिल्ली कॅपिटल्सने 6.25 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले आहे.

जलदगती गोलंदाज नॅथन कुल्टर-नाईल पाच कोटींवरून दोन कोटींवर आला आहे. राईली मेरिडिथ आठ कोटींवरून एक कोटींवर आला आहे. जेसन बहरेनडॉर्फ एक कोटींवरून ७५ लाखांवर आला आहे.

लिलावात विकलेले गेलेले ऑस्ट्रेलियन खेळाडू

डेव्हिड वॉर्नर, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, शॉन अॅबट, राईली मेरेडिथ, पॅट कमिन्स, मिचेल मार्श, मॅथ्यू वेड, जोश हेझलवूड, नॅथन कुल्टर-नाईल, डॅनियल सॅम्स. याशिवाय मार्कस स्टॉइनिसला लखनौ सुपरजायंट्सने तर ग्लेन मॅक्सवेलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रिटेन केले आहे.

अनसोल्ड राहिलेले ऑस्ट्रेलियन खेळाडू

अॅडम झाम्पा, अॅश्टन एगर, मार्नस लॅबुशेन, अँड्र्यू टाय, मोझेस हेन्रिक्स, जेम्स फॉल्कनर, डी’आर्की शॉर्ट, जोश फिलिप, बिली स्टॅनलेक, बेन कटिंग, बेन मॅकडरमॉट, कुर्टिस पॅटरसन, वेस अगर, जॅक वाइल्डरमथ, जोएल कार, एचएल कार, एच. ख्रिस ग्रीन, मॅट केली, बेन द्वारश्विस, हेडन केर, तन्वीर संघा, अॅलेक्स रॉस, जेक वेदरल्ड, नॅथन मॅकअँड्र्यू, टॉम रॉजर्स, लियाम गुथ्री, लियाम हॅचर, जेसोम संघा, मॅट शॉर्ट, एडन कॅहिल.

इतर बातम्या

खेळाडूंची किंमत वाढवतो, पण घेत तर नाही! कोणंय हा, जो खाली करतोय प्रतिस्पर्ध्यांची कोटींची पर्स?

DC IPL 2022 Auction: ‘त्या’ माणसाने किंमत वाढवून दुसऱ्यांची पर्स रिकामी केली पण स्वत: कमी बजेटमध्ये बांधला दिल्लीचा उत्तम संघ

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली