IPL 2022: ब्रेंडन मॅक्क्युलम KKR च्या कोच पदाचा राजीनामा देणार, नेमकं कारण काय?

IPL 2022: ब्रेंडन मॅक्क्युलम KKR च्या कोच पदाचा राजीनामा देणार, नेमकं कारण काय?
IPL 2022 KKR Brendon McCullum

IPL 2022: इंडियन प्रीमियर लीगचा यंदाचा सीजन संपल्यानंतर ब्रेंडन मॅक्क्युलम हे कोलकात नाइट रायडर्सच्या (KKR) हेड कोच पदावरुन पायउतार होतील.

दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 12, 2022 | 1:27 PM

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा यंदाचा सीजन संपल्यानंतर ब्रेंडन मॅक्क्युलम हे कोलकात नाइट रायडर्सच्या (KKR) हेड कोच पदावरुन पायउतार होतील. ब्रेंडन मॅक्क्युलम (Brendon McCullum) हे न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू आहेत. त्यांनी फ्रेंचायजीला या निर्णयाची माहिती दिली आहे. ब्रेंडन मॅक्क्युलम हे केकेआरचे हेड कोच आहेत. नुकतच केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरने (Shreyas iyer) टीमच्या निवडीमध्ये CEO चा सुद्धा सहभाग असतो, असं विधान केलं होतं. त्यावरुन एक नवीन वाद सुरु झाला होता. ब्रेंडन मॅक्क्युलम हे केकेआरच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा देतायत, त्याचा या सर्व प्रकरणाशी काहीही संबंध नाहीय. मॅक्क्युलम हे इंग्लंडच्या राष्टीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक बनण्याच्या शर्यतीत आहेत. त्यामुळेच ते केकेआरच्या कोच पदावरुन पायउतार होणार आहेत. स्पोर्ट्स टायगरने हे वृत्त दिलं आहे.

मॅक्क्युलम टीम मीटिंगमध्ये काय म्हणाले?

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, अलीकडेच टीम मीटिंगमध्ये ब्रेंडन मॅक्क्युलम यांनी संघातील खेळाडूंना आपल्या निर्णयाची माहिती दिली. इंग्लंड क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी संभाळत असल्यामुळे त्यांना केकेआरसोबत कायम राहता येणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. काही दिवसांपूर्वी टीम मीटिंगमध्ये त्यांनी हे सांगितलं. केकेआरमधील अंतर्गत सूत्राच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलंय.

पहिल्या सीजनपासून केकेआर सोबत

ब्रेंडन मॅक्क्युलम हे सुरुवातीपासून केकेआर सोबत जोडलेले आहेत. आयपीएलच्या पहिल्या सीजनमध्ये ते केकेआरकडून खेळले होते. निवृत्तीनंतर त्यांना 2019 मध्ये केकेआरच्या हेड कोच पदाची जबाबदारी देण्यात आली. मागच्या सीजनमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली केकेआरची टीम फायनलमध्ये पोहोचली होती. त्यामुळे त्यांचं बरच कौतुक करण्यात आलं.

मॅक्क्युलम रडारवर आहेत

आयपीएलच्या यंदाच्या सीजनमध्ये केकेआरचा प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष सुरु आहे. केकेआरच आव्हान अजूनही टिकून आहे. पण त्यांचा मार्ग सोपा नाहीय. केकेआरच्या संघात सतत बदल होत आहेत. त्यांना अजून विनिंग कॉम्बिनेशन बनवता आलेलं नाही. त्यामुळे मॅक्क्युलम रडारवर आहेत. इंग्लंडच्या हेड कोचच्या जॉबसाठी मॅक्क्युलम यांचं नाव आघाडीवर आहे. ब्रिटिश माध्यमांनुसार त्याच्या नावाची घोषणा लवकरच होऊ शकते.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें