AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs LSG IPL 2022: कायरन पोलार्ड OUT झाल्यानंतर कृणाल पंड्याने त्याला अशी दिली KISS पहा VIDEO

MI vs LSG IPL 2022: पोलार्ड चेंडूकडे बघत होता. या दरम्यान कृणालने त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. पण पोलार्ड पुढे निघून गेला होता.

MI vs LSG IPL 2022: कायरन पोलार्ड OUT झाल्यानंतर कृणाल पंड्याने त्याला अशी दिली KISS पहा VIDEO
Krunal pandya-kieron pollard
| Updated on: Apr 25, 2022 | 9:21 AM
Share

मुंबई: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएलमधला एक बलाढ्य संघ समजला जातो. पण यंदाच्या सीजनमध्ये ही टीम खूपच खराब फॉर्ममध्ये आहे. मुंबई इंडियन्सचा सलग आठ सामन्यात पराभव झाला आहे. या सीजनमध्ये मुंबई इंडियन्स एकतरी सामना जिंकेल? असा प्रश्न विचारला जातोय. मुंबई इंडियन्सकडे भरवाशाच्या खेळाडूंची कमतरता हेच त्यांच्या पराभवाचं मुख्य कारण आहे. मागच्या सीजनपर्यंत मुंबईकडून खेळणाऱ्या अनेक खेळाडूंना मेगा ऑक्शनमध्ये दुसऱ्या संघांनी विकत घेतलं. कृणाल पंड्या (Krunal pandya)  सुद्धा अशाच खेळाडूंपैकी एक. पंड्या बंधू मुंबई इंडियन्सचा आधारस्तंभ होते. पण आता हे दोघेही वेगवेगळ्या टीमकडून खेळतात. रविवारी मुंबई आणि लखनौमध्ये सामना झाला. त्यावेळी दोन जुने खेळाडू आमने-सामने आले होते. कृणाल पंड्या आता लखनौकडून तर पोलार्ड (kieron pollard) अजूनही मुंबईकडूनच खेळतोय. कालच्या सामन्यात कृणालने पोलार्डची विकेट काढली. त्यानंतरच्या कृणालने जे केलं, त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. मुंबई इंडियन्सचा या सामन्यात पराभव झाला. 36 धावांनी मुंबईने हा सामना गमावला. प्लेऑफमधून मुंबईचं आव्हान जवळपास संपुष्टातच आलं आहे.

पण पोलार्ड पुढे निघून गेला होता

कालच्या सामन्यात पोलार्ड 19 रन्सवर आऊट झाला. बाद झाल्यानंतर तो पॅव्हेलियनकडे जात होता. त्यावेळी त्याची विकेट मिळाल्यामुळे आनंदात असलेल्या कृणालने पाठिमागून पोलार्डच्या अंगावर उडी मारली व त्याचं चुंबन घेतलं. पोलार्ड चेंडूकडे बघत होता. या दरम्यान कृणालने त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. पण पोलार्ड पुढे निघून गेला होता. यावेळी कृणालने पाठिमागून पोलार्डच्या पाठिवर उडी मारली व त्याच्या डोक्याचं चुंबन घेतलं.

आम्ही तिघे भावासारखे

पंड्या बंधु आणि पोलार्डमध्ये चांगली मैत्री आहे. तिघेही मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्यांच्या मैत्रीची चर्चा व्हायची. पोलार्ड आणि आमच्यात चांगली मैत्री असून तीन भावांसारखे आम्ही आहोत, हे अनेकदा पंड्या बंधुंनी मान्य केलं आहे. आता तिघेही वेगवेगळ्या संघांकडून खेळतात. पण मैदानावरील त्यांच्यातील स्पर्धा अजिबात कमी झालेली नाही. कृणालने या सीजनमध्ये आपल्या भावाची हार्दिकचीही विकेट काढली. हार्दिक पंड्या गुजरात टायटन्सचा कॅप्टन आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.