IPL 2022: मलिंगा-ब्राव्हो ते हर्षल पटेल, जाणून घ्या गेल्या 14 वर्षातील पर्पल कॅप विजेत्यांची यादी

| Updated on: Mar 23, 2022 | 11:13 AM

IPL च्या पहिल्या सीझनपासून म्हणजेच 2008 पासून पर्पल कॅप देण्याचा ट्रेंड सुरु आहे. लीगच्या शेवटी, जो गोलंदाज सर्वाधिक बळी पूर्ण करतो, त्याच्या डोक्यावर ही पर्पल कॅप असते. जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि चेन्नई सुपरकिंग्सचा गोलंदाज ड्र्वेन ब्राव्होने ही कॅप सर्वात जास्त वेळा (2) जिंकली आहे.

IPL 2022: मलिंगा-ब्राव्हो ते हर्षल पटेल, जाणून घ्या गेल्या 14 वर्षातील पर्पल कॅप विजेत्यांची यादी
Harshal Patel
Image Credit source: IPL
Follow us on

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL-2022), जगातील सर्वोत्तम क्रिकेट लीगपैकी एक आहे. ही स्पर्धा 26 मार्चपासून सुरू होत आहे. ही लीग स्पर्धात्मक वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. या लीगने जगभरातील क्रिकेटपटूंच्या (Cricket) प्रामुख्याने भारतातल्या क्रिकेटपटूंच्या प्रतिभेला नवे आयाम दिले आहेत आणि केवळ भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रसिद्धी मिळवून देणारे खेळाडू दिले आहेत. ही लीग टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवली जात असल्याने साहजिकच येथे वेगवान क्रिकेट पाहायला मिळते, लीगमधल्या प्रत्येक सामन्यात धावांचा पाऊस पडतो, पण या लीगमध्ये काही गोलंदाजांनी हेही सिद्ध केलं आहे की, तुमच्यात प्रतिभा असेल तर चेंडूनेही सामना फिरवू शकता. आयपीएलमध्ये, जे खेळाडू गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी करतात, लीगमध्ये सर्वाधिक विकेट घेतात त्या गोलंदाजाला पर्पल कॅप (Purple cap) देऊन त्याचा गौरव केला जातो.

IPL च्या पहिल्या सीझनपासून म्हणजेच 2008 पासून पर्पल कॅप देण्याचा ट्रेंड सुरु आहे. लीगच्या शेवटी, जो गोलंदाज सर्वाधिक बळी पूर्ण करतो, त्याच्या डोक्यावर ही पर्पल कॅप असते. जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि चेन्नई सुपरकिंग्सचा गोलंदाज ड्र्वेन ब्राव्होने ही कॅप सर्वात जास्त वेळा (2) जिंकली आहे. तर मुंबई इंडियनसचा माजी खेळाडू लसिथ मलिंगाने या स्पर्धेत सर्वात जास्त विकेट घेतल्या आहेत.

2008 ते 2021 पर्यंतचे पर्पल कॅप विजेते गोलंदाज

  1. सोहेल तन्वीर, राजस्थान रॉयल्स, 22 विकेट, 2008
  2. आरपी सिंग, डेक्कन चार्जेस, 23 विकेट्स, 2009
  3. प्रज्ञान ओझा, डेक्कन चार्जेस, 21 विकेट्स, 2010
  4. लसिथ मलिंगा, मुंबई इंडियन्स, 28 विकेट्स, 2011
  5. मोर्ने मॉर्केल, दिल्ली डेअरडेव्हिल्स, 25 विकेट्स, 2012
  6. ड्वेन ब्राव्हो, चेन्नई सुपर किंग्ज, 32 विकेट्स, 2013
  7. मोहित शर्मा, चेन्नई सुपर किंग्ज, 23 विकेट्स, 2014
  8. ड्वेन ब्राव्हो, चेन्नई सुपर किंग्ज, 26 विकेट्स, 2015
  9. भुवनेश्वर कुमार, सनरायझर्स हैदराबाद, 23 विकेट, 2016
  10. भुवनेश्वर कुमार, सनरायझर्स हैदराबाद, 26 विकेट, 2017
  11. अँड्र्यू टाय, किंग्ज इलेव्हन पंजाब, 24 विकेट, 2018
  12. इम्रान ताहिर, चेन्नई सुपर किंग्ज, 26 विकेट्स, वर्ष 2019
  13. कागिसो रबाडा, दिल्ली कॅपिटल्स, 30 विकेट्स, वर्ष 2020
  14. हर्षल पटेल, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, 32 विकेट, 2021

इतर बातम्या

IPL 2022 मध्ये कॉमेंटेटर्स होणार मालामाल, हर्षा भोगले ते सुनील गावस्कर जाणून घ्या दिग्गजांची ‘फी’

IPL 2022 ला चार दिवस उरलेले असताना Delhi Capitals साठी मोठी गुड न्यूज, हुकूमी एक्का 7 एप्रिलला करणार कमबॅक

Womens World Cup 2022 IND vs BAN: भारताने बांग्लादेशला चिरडलं, जाणून घ्या विजयाची 5 कारणं