IPL 2022: सचिन तेंडुलकर ते ऋतुराज गायकवाड, जाणून घ्या गेल्या 14 वर्षातील ऑरेंज कॅप विजेत्यांची यादी

आयपीएल-2022 (IPL 2022) ही स्पर्धा काही दिवसात सुरू होणार आहे. या मोसमातील पहिला सामना 26 मार्च रोजी खेळवला जाणार आहे. स्पर्धेतला पहिला सामना सध्याचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि उपविजेता कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यात खेळवला जाणार आहे.

IPL 2022: सचिन तेंडुलकर ते ऋतुराज गायकवाड, जाणून घ्या गेल्या 14 वर्षातील ऑरेंज कॅप विजेत्यांची यादी
IPL Orange cap Image Credit source: IPL
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 10:01 AM

मुंबई : आयपीएल-2022 (IPL 2022) ही स्पर्धा काही दिवसात सुरू होणार आहे. या मोसमातील पहिला सामना 26 मार्च रोजी खेळवला जाणार आहे. स्पर्धेतला पहिला सामना सध्याचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि उपविजेता कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यात खेळवला जाणार आहे. देशातील कोरोनाच्या परिस्थितीमुळे आयपीएलचे आयोजन महाराष्ट्रातच करण्यात आले आहे. मुंबईतील तीन आणि पुण्यातील एका स्टेडियमवर हे सामने खेळवले जाणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर सामने खेळवले जातील, तर पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम या सामन्यांचे आयोजन करेल. यंदादेखील आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाहायला मिळेल. आयपीएलच्या प्रत्येक मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप (Orange Cap) दिली जाते. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नरने ही कॅप तीनदा पटकावली आहे.

स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप आणि सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप देण्याची पद्धत स्पर्धेच्या पहिल्या सत्रापासून सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत डेव्हिड वॉर्नरने ही कॅप सर्वाधिक तीन वेळा जिंकली आहे. त्याच्यानंतर यादीत ख्रिस गेलचे नाव आहे. गेलने ही कॅप दोनदा जिंकली आहे. आज आम्ही तुम्हाला अशा खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांनी ही कॅप जिंकली आहे.

ऑरेंज कॅप विजेत्यांची यादी, 2008 ते 2021

  1. शॉन मार्श, किंग्ज इलेव्हन पंजाब, 616 धावा, 2008
  2. मॅथ्यू हेडन, चेन्नई सुपर किंग्ज, 572 धावा, 2009
  3. सचिन तेंडुलकर, मुंबई इंडियन्स, 618 धावा, 2010
  4. ख्रिस गेल, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, 608 धावा, 2011
  5. ख्रिस गेल, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, 733 धावा, 2012
  6. मायकेल हसी, चेन्नई सुपर किंग्ज, 733 धावा, 2013
  7. रॉबिन उथप्पा, कोलकाता नाइट रायडर्स, 660 धावा, 2014
  8. डेव्हिड वॉर्नर, सनरायझर्स हैदराबाद, 562 धावा, 2015
  9. विराट कोहली, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, 973 धावा, 2016
  10. डेव्हिड वॉर्नर, सनरायझर्स हैदराबाद, 641 धावा, 2017
  11. केन विल्यमसन, सनरायझर्स हैदराबाद, 735 धावा, 2018
  12. डेव्हिड वॉर्नर, सनरायझर्स हैदराबाद, 692 धावा, 2019
  13. केएल राहुल, पंजाब किंग्ज, 670 धावा, वर्ष 2020
  14. ऋतुराज गायकवाड, चेन्नई सुपर किंग्ज, 635 धावा, 2021

इतर बातम्या

IPL 2022 मध्ये कॉमेंटेटर्स होणार मालामाल, हर्षा भोगले ते सुनील गावस्कर जाणून घ्या दिग्गजांची ‘फी’

IPL 2022 ला चार दिवस उरलेले असताना Delhi Capitals साठी मोठी गुड न्यूज, हुकूमी एक्का 7 एप्रिलला करणार कमबॅक

Womens World Cup 2022 IND vs BAN: भारताने बांग्लादेशला चिरडलं, जाणून घ्या विजयाची 5 कारणं

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.