IPL 2022: ‘मला माहितीय कसं खेळायचं’, KOO वर KL Rahul चा सूचक मेसेज

10 टीम्स असलेल्या या लीगमध्ये 2 संघ आता प्लेऑफच्या दरवाज्यावर उभे आहेत. शेवटच्या दोन स्थानांसाठी जवळपास 5 संघांमध्ये संघर्ष सुरू आहे.

IPL 2022: 'मला माहितीय कसं खेळायचं', KOO वर KL Rahul चा सूचक मेसेज
LSG Captain KL RahulImage Credit source: IPL
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 1:52 PM

मुंबई: IPL 2022 स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (MI vs CSK) हे दोन संघ सोडल्यास उर्वरित आठ संघांमध्ये प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी जोरदार स्पर्धा आहे. या स्पर्धेत खेळाडूंना बराच पैसा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नाम कमावलेल्या खेळाडूंवर तर पैशांचा (Money) पाऊस पडला आहे. आयपीएलमधून खेळाडूंना अमाप पैसा मिळत असला, तरी त्यांच्यावर चांगल्या कामगिरीचा दबावही असतो. पैशांपेक्षा चांगला खेळ त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो. कारण त्यावर त्यांचं भविष्य अवलंबून असतं. आता आयपीएल 2022 स्पर्धा लीग स्टेजच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. प्रत्येक सामन्याबरोबर रोमांचही वाढत चालला आहे.

मैदानात घाम गाळल्यानंतर खेळाडू काय करतात?

10 टीम्स असलेल्या या लीगमध्ये 2 संघ आता प्लेऑफच्या दरवाज्यावर उभे आहेत. शेवटच्या दोन स्थानांसाठी जवळपास 5 संघांमध्ये संघर्ष सुरू आहे. यादरम्यान खेळाडू क्रिकेटच्या मैदानात ‘करा किंवा मरा’ या मानसिकतेत असतात. सामने आणि प्रॅक्टिसच्यावेळी असलेला दबाव कमी करण्यासाठी मोकळ्या वेळेत हे खेळाडू आपले छंद जोपासतात. मैदानाबाहेर हे सगळेच रिलॅक्स मूडमध्ये दिसतात. काही खेळाडू मोकळ्या वेळेत चित्रपट पाहणे, कुकिंग करण्याचा आनंद घेत आहेत, तर काही खेळाडू मनापासून इनडोर गेम्सचा आनंद घेत आहेत. अनेक खेळाडू सोशल मीडियावर इनडोर गेम्स आणि स्वीमिंगचे व्हीडियोजही शेयर करत आहेत. लखनौ सुपर जायंट्सचा कॅप्टन केएल राहुलने पूल टेबलवरचा एक व्हीडियो शेयर केला आहे. त्यात त्याने ‘कू’ वर लिहिलं आहे की, मला माहीतीय नेमकं कसं खेळायचं आहे.

Koo App

केएल राहुलने आतापर्यंत किती धावा केल्या?

लखनौ सुपर जायंट्स पॉइंटस टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. संघासाठी कॅप्टन केएल राहुल खोऱ्याने धावा करतोय. राहुलची बॅट तळपली नाही, तर लखनौचा संघ अडचणीत येतो. अनेक सामन्यात हे दिसून आलय. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत राहुल दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत 12 सामन्यात एकूण 459 धावा केल्या आहेत. यात दोन शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.