AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Indians IPL 2022: मुंबई इंडियन्समधून बाहेर पडलेल्या हार्दिक पंड्यावर रोहित शर्माने केलं वक्तव्य

IPL 2022 स्पर्धा सुरु व्हायला आता फक्त तीन दिवसांचा अवधी उरला आहे. मुख्य स्पर्धेला सुरुवात होण्याआधी आज मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पत्रकार परिषद घेतली.

Mumbai Indians IPL 2022: मुंबई इंडियन्समधून बाहेर पडलेल्या हार्दिक पंड्यावर रोहित शर्माने केलं वक्तव्य
रोहित शर्मा-हार्दिक पंड्याImage Credit source: File photo
| Updated on: Mar 23, 2022 | 4:07 PM
Share

IPL 2022 स्पर्धा सुरु व्हायला आता फक्त तीन दिवसांचा अवधी उरला आहे. मुख्य स्पर्धेला सुरुवात होण्याआधी आज मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पत्रकार परिषद घेतली. रोहितने या पत्रकार परिषदेत मुंबई इंडियन्सची साथ सोडणाऱ्या हार्दिक पंड्याबद्दल वक्तव्य केलं. हार्दिक आता गुजरात टायटन्सचा कॅप्टन आहे. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे आयपीएलमधले दोन नवीन संघ आहेत. रोहितने आज पत्रकार परिषदेत हार्दिक पंड्याला शुभेच्छा दिल्या. हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्स टीमसाठी जे योगदान दिलेय, ते कधी विसरता येणार नाही, असं रोहित शर्मा म्हणाला. त्याने आमच्यासाठी खूप चांगली कामगिरी केली. तो आता एका टीमचा कॅप्टन आहे. माझ्या शुभेच्छा त्याच्यासोबत आहेत, असं रोहित म्हणाला.

हार्दिकसाठी किती कोटी मोजले?

आयपीएल 2022 मेगा ऑक्शनआधी मुंबई इंडियन्सने आपल्या खेळाडूंची यादी प्रसिद्ध केली. यात हार्दिक पंड्याचं नाव नव्हतं. मुंबई इंडियन्सच्या या निर्णयाने अनेकजण हैराण झाले होते. मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि कायरन पोलार्डला रिटेन केलं होतं. हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्स मधून बाहेर पडल्यानंतर गुजरात टायटन्सचं कॅप्टनपद स्वीकारलं. गुजरात टायटन्सने 15 कोटी रुपये मोजून हार्दिक पंड्याला आपल्या ताफ्यात घेतलं. हार्दिकने याआधी आयपीएलमध्ये कधीही कुठल्या संघाचे कर्णधारपद भूषवलेलं नाही.

त्याने सौरव गांगुलींचा सल्ला ऐकला नाही

हार्दिक मागच्यावर्षी झालेल्या टी 20 वर्ल्ड कप नंतर एकही सामना खेळलेला नाही. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. हार्दिकच्या फॉर्मवर वारंवार प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. हार्दिक गोलंदाजी करु शकतो का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी हार्दिकला रणजी क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला होता. पण त्याने तो ऐकला नाही.

यो-यो टेस्टमध्ये किती गुण मिळवले?

हार्दिक स्वत: खासगीमध्ये फिटनेसवर मेहनत घेत होता. त्याला अखेर बीसीसीआयने राष्ट्रीय क्रिकेट अकादमी म्हणजे NCA मध्ये येऊन फिटनेस सिद्ध करायला सांगितला. हार्दिक त्यानुसार एनसीएमध्ये गेला व त्याने फिटनेस सिद्ध करुन दाखवला. हार्दिकला गोलंदाजी करुन दाखवायला सांगितली. कठीण समजली जाणारी Yo-Yo टेस्ट द्यायला लावली. हार्दिकने ते सर्व निकष पूर्ण केले.

प्रतितास किती वेगाने गोलंदाजी केली?

हार्दिकने प्रतितास 135 किमी वेगाने गोलंदाजी केली. यो-यो टेस्ट मध्येही 17 गुण मिळवले. सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधील क्रिकेटपटूंवर NCA च्या मेडीकल स्टाफचं बारीक लक्ष असतं. टीम इंडियातील खेळाडूंना यो-यो टेस्टमध्ये किमान 16.5 स्कोर आवश्यक आहे.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.