IPL 2022, Orange cap : ऑरेंज कॅपवर बटलर ‘राज’ कायम, तुमचा आवडता खेळाडू कुठे, जाणून घ्या…

| Updated on: May 21, 2022 | 9:45 AM

आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये जोस बटलर ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये पहिल्या स्थानी कायम आहे. त्याने आतापर्यंत 629 धावा आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये काढल्या आहेत.

IPL 2022, Orange cap : ऑरेंज कॅपवर बटलर राज कायम, तुमचा आवडता खेळाडू कुठे, जाणून घ्या...
जोस बटलर
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई :  इंडियन प्रीमियर लीगच्या 2022 (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये राजस्थान रॉयल्स (RR) प्लेऑफसाठी पात्र ठरणारा तिसरा संघ ठरला आहे. शुक्रवारी रात्री ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या सामन्यात संघाने चेन्नई सुपर किंग्जला (CSK) पाच विकेट्सने पराभूत करून गुणतालिकेत क्रमांक-2 गाठला. नाणेफेक जिंकल्यानंतर धोनीच्या CSK ने स्कोअरबोर्डवर 150 धावा केल्या होत्या. ज्याला प्रत्युत्तर म्हणून दोन चेंडूंपूर्वी लक्ष्य गाठले गेले. यशस्वी जैस्वाल (44 चेंडूत 59 धावा) यानंतर रविचंद्रन अश्विनने 23 चेंडूत नाबाद 40 धावा केल्या. रियान परागसोबत त्याची चांगलीच जम बसली. यासह चेन्नईने 14 सामन्यांतील 10व्या पराभवासह आपला प्रवास संपवला. यानंतर आयपीएलच्या ऑरेंज कॅपमध्ये काय बदल झालाय पाहुया…

ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल

आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये जोस बटलर ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये पहिल्या स्थानी कायम आहे. त्याने आतापर्यंत 629 धावा आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये काढल्या आहेत. दुसऱ्या स्थानी केएल राहुल आहे. राहुलने आयपीएलच्या या सीजनमध्ये 537 धावा काढल्या आहेत. त्यानंतर तिसऱ्या स्थानी डी कॉक आहे. त्याने 502 धावा केल्या आहेत. तर चौथ्या स्थानी फाफ डु प्लेसिसला धक्का देत दीपक हुड्डा आलाय. त्याने 443 धावा आयपीएलच्या या सीजनमध्ये काढल्या आहेत. पाचव्या स्थानी शिखर धवन आहे. त्याने 421 धावा आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये केल्या आहेत.

ऑरेंज कॅपचा टेबल

फलंदाज धावा
जोस बटलर718
केएल राहुल 537
डी कॉक502
शिखर धवन460
हार्दिक पांड्या453

कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.

हे सुद्धा वाचा

टॉप फाईव्ह संघ

कालच्या सामन्यानंतर आयपीएलचा पॉईंट्स टेबल बघितल्यास राजस्थान रॉयल्सच्या विजयात आणखी एका सामन्याच्या विजयाची भर पडली आहे. पॉईट्स टेबलमध्ये गुजरात टायटन्स पहिल्या क्रमांकावर आहे. या संघाने एकूण 14 सामने खेळले आहेत. त्यापैकी 10 सामन्यात त्यांना विजय मिळालाय तर 4 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. दुसऱ्या स्थानी राजस्थान रॉयल्स आहे. या संघाने कालचा धरून एकूण 14 सामन्यांपैकी नऊ सामन्यात यश संपादन केलंय. तर पाच सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय.

राजस्थानचा 14 सामन्यांतील हा नववा विजय

राजस्थानचा 14 सामन्यांतील हा नववा विजय आहे . संघाचे नाव लखनौ सुपर जायंट्सच्या 18 गुणांच्या बरोबरीचे आहे परंतु चांगल्या नेट रनरेटमुळे ते दुसऱ्या स्थानावर आहेत.