IPL 2022 Prize Money: गुजरातवर पैशांचा पाऊस, उपविजेते राजस्थानही मालामाल, जाणून घ्या कुठल्या खेळाडूला किती पैसा मिळाला

IPL 2022 Prize Money: आयपीएल 2022 मध्ये फक्त संघांनाच पैसा मिळाला नाही, तर खेळाडुंनी सुद्धा चांगला कमाई केली. गुजरात आणि राजस्थानमधील फायनल संपल्यानंतर खेळाडूंना इनामी रक्कमेने सन्मानित करण्यात आले.

IPL 2022 Prize Money: गुजरातवर पैशांचा पाऊस, उपविजेते राजस्थानही मालामाल, जाणून घ्या कुठल्या खेळाडूला किती पैसा मिळाला
GT vs RR Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 11:35 AM

मुंबई: इंडियन प्रिमीयर लीगचा 15 वा सीजन संपला असून आता Prize Money ची चर्चा सुरु झाली आहे. आयपीएलचं विजेतेपद मिळवणाऱ्या गुजरात टायटन्सच्या (Gujarat Titans) हाती जणू कुबेराचा खजिना लागला आहे. पराभूत होणाऱ्या राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) सुद्धा कोट्यवधीची कमाई केली आहे. प्लेऑफमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर राहिलेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन संघांनीही घसघशीत कमाई केली आहे. टॉपमधल्या पहिल्या चार संघांवर पैशांचा पाऊस पडला. काल 29 मे रोजी गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला सात विकेटने नमवून आयपीएलचं विजेतेपद मिळवलं. आयपीएलला एक नवीन चॅम्पियन मिळाला आहे.

आयपीएल 2022 मध्ये फक्त संघांनाच पैसा मिळाला नाही, तर खेळाडुंनी सुद्धा चांगला कमाई केली. गुजरात आणि राजस्थानमधील फायनल संपल्यानंतर खेळाडूंना इनामी रक्कमेने सन्मानित करण्यात आले. खेळाडूंना मिळालेल्या बक्षिसाची रक्कम लाखोंमध्ये आहे. फायनल झाल्यानंतर संघ आणि खेळाडूंना बक्षिसापोटी किती रक्कम मिळाली, ते जाणून घेऊया.

टॉप 4 टीम्सना किती रक्कम मिळाली?

आयपीएल 2022 ची चॅम्पिशिप जिंकणाऱ्या गुजरात टायटन्सला इनामापोटी 20 कोटीची रक्कम मिळाली. उपविजेतेपद मिळवणाऱ्या राजस्थान रॉयल्सला 13 कोटी रुपये मिळाले. तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला 7 कोटी रुपये आणि लखनौ सुपर जायंट्सला इनामापोटी 6.50 कोटी मिळाले.

आयपीएल 2022 मध्ये संघांप्रमाणेच खेळाडूंवरही पैसा बरसला. चांगलं प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंनी लाखोंची कमाई केली.

विजेते – गुजरात टायटन्स – 20 कोटी उप विजेते – राजस्थान रॉयल्स – 13 कोटी तिसरं स्थान – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर – 7 कोटी चौथं स्थान – लखनौ सुपर जायंट्स – 6.50 कोटी ऑरेंज कॅप – जोस बटलर – 863 धावा – 10 लाख रुपये पर्पल कॅप – युजवेंद्र चहल – 27 विकेट – 10 लाख रुपये IPL इमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट – उमरान मलिक – 10 लाख रुपये मॅक्सिमम सिक्सर पुरस्कार – जोस बटलर – 10 लाख रुपये गेम चेंजर ऑफ सीजन – जोस बटलर – 10 लाख रुपये आयपीएलमधील वेगवान चेंडू – लॉकी फर्ग्युसन – 10 लाख रुपये सुपर स्ट्राइकर ऑफ द सीजन – दिनेश कार्तिक – टाटा पंच कार कॅच ऑफ द सीजन – इविन लुइस – 10 लाख रुपये

Non Stop LIVE Update
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.