AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK चा Ruturaj Gaikwad आठ चेंडूत दोन वेळा त्याच्यासमोर फेल, KXIP चा हा गोलंदाज CSK चा बिघडवणार खेळ

CSK Ruturaj Gaikwadआयपीएल 2022 (IPL 2022) सुरु झाल्यापासून चेन्नईची खराब स्थिती आहे. पहिल्या दोन सामन्यात चेन्नईचा पराभव झाला आहे. दोन्ही सामन्यात चेन्नईचे (CSK) सलामीवीर फ्लॉप ठरले आहेत.

CSK चा Ruturaj Gaikwad आठ चेंडूत दोन वेळा त्याच्यासमोर फेल, KXIP चा हा गोलंदाज CSK चा बिघडवणार खेळ
CSK Ruturaj GaikwadImage Credit source: PTI
| Updated on: Apr 03, 2022 | 6:01 PM
Share

मुंबई: आयपीएल 2022 (IPL 2022) सुरु झाल्यापासून चेन्नईची खराब स्थिती आहे. पहिल्या दोन सामन्यात चेन्नईचा पराभव झाला आहे. दोन्ही सामन्यात चेन्नईचे (CSK) सलामीवीर फ्लॉप ठरले आहेत. तिसऱ्या सामन्यातही सलामीची जोडी कमाल दाखवेल, याची शक्यता कमी आहे. सलामीची जोडी प्रभाव पाडणार नाही, हे लिहिताना आकडेच तसे संकेत देत आहेत. ज्या सामन्यात ऋतुराज गायकवाडची (Rututaj Gaikwad) बॅट तळपणार, त्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्स धावांचा मोठा डोंगर उभा करेल. पण सध्या वास्तव हे आहे की, ऋतुराजच्या बॅटमधून धावा आटल्या आहेत. त्यामुळेच 15 व्या सीजमध्ये चेन्नई सुपर किंग्सला अपेक्षित सुरुवात करता आलेली नाही. आयपीएलच्या प्रत्येक सीजन बरोबर ऋतुराज गायकवाडची एक वेगळी गोष्ट आहे.

IPL खेळायला सुरुवात केली, तेव्हापासून….

ऋतुराजने जेव्हापासून आयपीएलमध्ये खेळायला सुरुवात केली, तेव्हापासून पहिल्या तीन सामन्यांमध्ये त्याला धावांचा दुष्काळ संपवता आलेला नाही. आज पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यातही हाच सिलसिला कायम राहिला, तर CSK ची पुन्हा एकदा खराब सुरुवात होईल. चेन्नई सुपर किंग्स आपला तिसरा सामना पंजाब किंग्स विरुद्ध खेळणार आहे.

ऋतुराजच फॉर्ममध्ये परतणं मुश्किलं

पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात फॉर्म मिळवणं, ऋतुराजसाठी थोडं कठीण आहे. कारण पंजाबचा एक गोलंदाज ऋतुराजच्या मार्गात मोठा अडथळा आहे. अर्शदीप सिंह हा पंजाब किंग्सचा अनुभवी, प्रतिभावान गोलंदाज आहे. त्याच्याविरोधात ऋतुराज गायकवाडची कामगिरी फारशी चांगली नाहीय.

ऋतुराज गायकवाड VS अर्शदीप सिंह

आयपीएलच्या पीचवर ऋतुराज गायकवाड आणि अर्शदीप सिंह फक्त आठ चेंडूंपुरता आमने-सामने आले आहेत. पण या आठ चेंडूंमधून कोण कोणावर किती भारी पडतो, ते आकड्यांवरुन कळतं. अर्शदीपने ऋतुराज गायकवाडचा आठ चेंडूत दोनवेळा विकेट घेतला आहे. दोनच्या सरासरीने त्याला फक्त चार धावा करु दिल्यात. पाच चेंडू डॉट टाकलेत. हाच रेकॉर्ड आजच्या सामन्यात कायम राहिला, तर CSK ला चांगली सुरुवात मिळणं मुश्किल आहे.

ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....