AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022: धोनीने कर्णधारपद सोडलं, CSK आता पहिल्यासारखी टीम राहिली नाही : वीरेंद्र सेहवाग

धोनीच्या नेतृत्वाशिवाय चेन्नईची कल्पना करणे अवघड आहे, पण तसे घडले आहे. दरम्यान, धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर चेन्नईचा संघ तसाच राहील का, असा प्रश्‍न प्रत्येकाच्या मनात असेल. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागला वाटते की, धोनीच्या नेतृत्वाशिवाय चेन्नईचा संघ पूर्वीसारखा राहणार नाही.

IPL 2022: धोनीने कर्णधारपद सोडलं, CSK आता पहिल्यासारखी टीम राहिली नाही : वीरेंद्र सेहवाग
MS DhoniImage Credit source: CSK
| Updated on: Mar 26, 2022 | 9:40 AM
Share

मुंबई : बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला (IPL) सुरुवात होण्यापूर्वी एमएस धोनीने (MS Dhoni) चेन्नई सुपरकिंग्स संघाचे कर्णधारपद सोडण्याचा (MS Dhoni Quits Captaincy) निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. धोनी हा सीजन खेळून पुढच्या मोसमात कॅप्टनशिप सोडेल अशी चर्चा होती. पण धोनीने सीएसकेचे कर्णधारपद सोडलं आहे. धोनीने रवींद्र जाडेजाकडे (Ravindra Jadeja) चेन्नईचे कर्णधारपद सोपवलं आहे. धोनीचा कर्णधारपद सोडण्याचा निर्णय सीएसकेच्या फॅन्ससाठी नक्कीच धक्कादायक आहे. धोनी आयपीएलमधील एक यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली सीएसकेच्या टीमने आतापर्यंत चार वेळा विजेतेपद मिळवलं आहे. धोनीने रवींद्र जाडेजाकडे सीएसकेची कॅप्टनशिप सोपवली आहे. जाडेजा 2012 पासून चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतोय. सीएसकचे नेतृत्व करणारा तो तिसरा क्रिकेटपटू आहे.

धोनीच्या नेतृत्वाशिवाय चेन्नईची कल्पना करणे अवघड आहे, पण तसे घडले आहे. दरम्यान, धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर चेन्नईचा संघ तसाच राहील का, असा प्रश्‍न प्रत्येकाच्या मनात असेल. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागला वाटते की, धोनीच्या नेतृत्वाशिवाय चेन्नईचा संघ पूर्वीसारखा राहणार नाही.

2008 मध्ये आयपीएलच्या सुरुवातीपासून धोनी चेन्नईचा कर्णधार होता आणि त्याच्या नेतृत्वाखाली त्याने संघाला चार वेळा आयपीएल विजेतेपद मिळवून दिले आहे. 2010, 2011, 2018 आणि 2021 मध्ये जेतेपद पटकावण्यात संघाला यश आले होते. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने प्रत्येक वेळी आयपीएल प्लेऑफमध्ये (अपवाद 2020) स्थान पटकावलं आहे.

जडेजा केवळ नावाचा कर्णधार, कमान धोनीच्याच हाती

क्रिकबझ शोमध्ये सेहवाग म्हणाला, “मी यापूर्वी काही व्हिडीओ शेअर केले होते आणि सांगितले होते की, जर आपण अनुभवाबद्दल बोलत असू तर तुम्ही धोनीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. धोनी कर्णधार नसल्यामुळे यावेळी आपण तसं करु शकू. तो कर्णधार नसेल तर चेन्नईचा संघ पूर्वीसारखा खेळणार नाही, अर्थातच तो मैदानात उभा असे. विराट कोहली जेव्हा भारतीय संघाच्या एकदिवसीय आणि टी-20 संघाचा कर्णधार झाला तेव्हा आपण पाहिलं आहे, पण धोनीच्या काळात भारतीय संघ तसा नव्हता. जडेजा नावाने आणि कामाने धोनीच कर्णधार असेल. पुढच्या वर्षी धोनी मैदानावर दिसणार नाही. त्या दृष्टीने हे एक चांगले पाऊल आहे.”

इतर बातम्या

Rajasthan Royals Controversy: IPL सुरु व्हायच्या 24 तास आधी पहिला राडा, RR मध्ये आपसातच वाजलं, संजू सॅमसन का भडकला?

PAK vs AUS Test: Pat Cummins च्या ‘या’ क्लासिक यॉर्करसमोर बिचाऱ्या मोहम्मद रिझवानचा तरी कसा निभाव लागेल? पहा VIDEO

IPL 2022 Mumbai Indians चा संघ सरस वाटतो, पण एका विभागात नक्की गडबडणार

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.