MS Dhoni hands over captaincy: एमएस धोनीने CSK चं कर्णधारपद सोडलं, रवींद्र जडेजा नवीन कॅप्टन

MS Dhoni hands over captaincy: भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू एमएस धोनीने (MS dohni) अखेर चेन्नई सुपर किंग्सचे (Csk captaincy) कर्णधारपद सोडलं आहे.

MS Dhoni hands over captaincy: एमएस धोनीने CSK चं कर्णधारपद सोडलं, रवींद्र जडेजा नवीन कॅप्टन
IPL 2022: एमएस धोनीने CSK चं कर्णधारपद सोडलं Image Credit source: File photo
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 3:29 PM

मुंबई: भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू एमएस धोनीने (MS dohni) अखेर चेन्नई सुपर किंग्सचे (Csk captaincy) कर्णधारपद सोडलं आहे. धोनी हा सीजन खेळून पुढच्या मोसमात कॅप्टनशिप सोडेल अशी चर्चा होती. पण धोनीने सीएसकेचे कर्णधारपद सोडलं आहे. धोनीने रवींद्र जाडेजाकडे (Ravindra Jadeja) चेन्नईचे कर्णधारपद सोपवलं आहे. धोनीचा कर्णधारपद सोडण्याचा निर्णय सीएसकेच्या फॅन्ससाठी नक्कीच धक्कादायक आहे. धोनी आयपीएलमधील एक यशस्वी कर्णधार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सीएसकेच्या टीमने आतापर्यंत चार वेळा विजेतेपद मिळवलं आहे. धोनीने रवींद्र जाडेजाकडे सीएसकेची कॅप्टनशिप सोपवली आहे. जाडेजा 2012 पासून चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतोय. सीएसकचे नेतृत्व करणारा तो तिसरा क्रिकेटपटू आहे. एमएस धोनीने चेन्नईच्या टीमला एक ओळख मिळवून दिली. धोनीने CSK मध्ये अनेक क्रिकेटपटूंना घडवलं.

धोनीचा हा शेवटचा सीजन का?

अधिकृत स्टेटमेंटनुसार, धोनीने कॅप्टनशिप सोडली असली, तरी तो चेन्नईकडून खेळत रहाणार आहे. 2008 मध्ये आयपीएल स्पर्धेला सुरुवात झाली तेव्हापासून धोनी चेन्नईचे नेतृत्व करत आहे. खेळाडू म्हणून धोनीचा कदाचित हा शेवटचा आयपीएल सीजन असू शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तो आधीच निवृत्त झाला आहे.

विजयाची टक्केवारी किती?

धोनीच्या नेतृत्वाखाली CSK ने (2010, 2011, 2018, आणि 2021) या चार सीजनमध्ये विजेतेपद मिळवलं. विजेतेपदाच्या बाबतीत ते मुंबई इंडियन्सच्या मागे आहेत. मुंबईच्या टीमने पाचवेळा आयपीएलचे जेतेपद पटकावलं आहे. आयपीएलमध्ये चेन्नईची विजयाची टक्केवारी (64.83%) आहे. 11 वेळा चेन्नईचा संघ प्लेऑफ आणि नऊ वेळा फायनलमध्ये पोहोचला. दोन दिवसांनी शनिवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नईचा कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सलांमीचा सामना होणार आहे. मागच्या सीजमध्ये चेन्नईचा संघ विजेता, तर केकेआरच्या टीमने उपविजेतेपद मिळवलं होतं.

CSK ने अधिकृत स्टेटमेंटमध्ये काय म्हटलं आहे?

महेंद्र सिंह धोनीने स्वत: चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने रवींद्र जाडेजाला टीमचा नवीन कॅप्टन म्हणून निवडलं आहे. जाडेजा 2012 पासून संघाचा महत्त्वाचा भाग आहे. तो आमच्या संघाचा तिसरा कॅप्टन आहे. एमएस धोनी हा सीजन आणि त्यापुढच्या सीजनमध्येही संघासोबतच असेल. आयपीएल 2022 मेगा ऑक्शन दरम्यान रवींद्र जाडेजाला CSK ने रिटेन केलं होतं. जाडेजा चेन्नईने रिटेन केलेला सर्वात महागडा खेळाडू होता. चेन्नईने त्याच्यासाठी 16 कोटी रुपये खर्च केले. एमएस धोनीला रिटेन करण्यासाठी 12 कोटी रुपये खर्च केले.

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.