AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 चे स्टार रणजीमध्ये फ्लॉप, गिल, पृथ्वी शॉ, जैस्वालच्या बॅटला काय झालय?

रणजी करंडक (Ranji Trophy) स्पर्धेत बाद फेरीचे सामने रविवारपासून सुरु झाले आहेत. क्वार्टर फायनलमध्ये आठ संघ आमने-सामने आहेत. टीम इंडियातून (Team India) खेळलेले खेळाडू रणजी स्पर्धेत खेळत आहेत.

IPL 2022 चे स्टार रणजीमध्ये फ्लॉप, गिल, पृथ्वी शॉ, जैस्वालच्या बॅटला काय झालय?
Prithvi-shubhaman Image Credit source: PTI
| Updated on: Jun 06, 2022 | 6:34 PM
Share

मुंबई: रणजी करंडक (Ranji Trophy) स्पर्धेत बाद फेरीचे सामने रविवारपासून सुरु झाले आहेत. क्वार्टर फायनलमध्ये आठ संघ आमने-सामने आहेत. टीम इंडियातून (Team India) खेळलेले खेळाडू रणजी स्पर्धेत खेळत आहेत. IPL 2022 मध्ये दमदार खेळ दाखवणारे हे प्लेयर्स रणजीमध्ये मात्र फ्लॉप झाले आहेत. इंग्लंडमध्ये होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी शुभमन गिलची भारतीय संघात निवड झाली आहे. शुभमन गिल आयपीएल 2022 चा चॅम्पियन संघ Gujarat Titans चा भाग आहे. गुजरातकडून तो सलामीला येत होता. रणजीमध्ये शुभमन गिल पंजाबसाठी खेळतोय. मध्य प्रदेशविरुद्ध पंजाबचा सामना सुरु आहे. गिल रणजीमध्ये अजिबात प्रभावी ठरला नाही. फक्त 9 धावा करुन पुनित दातेच्या चेंडूवर आऊट झाला.

पृथ्वी शॉ मुंबईचा कॅप्टन

पृथ्वी शॉ सुद्धा भारतीय संघाचा भाग होता. पण तो सध्या टीम बाहेर आहे. रणजी करंडक स्पर्धेत तो मुंबईच कर्णधारपद भूषवतोय. मुंबईची मॅच उत्तराखंड विरुद्ध आहे. पृथ्वी शॉ रणजीमध्ये विशेष काही करु शकला नाही. 21 धावांवर तो क्लीन बोल्ड झाला. मुंबईकडून बाद होणारा तो पहिला फलंदाज ठरला. 36 धावांवर मुंबईची पहिली विकेट गेली. दीपक धापोलने त्याला आऊट केलं.

मयंक अग्रवाल कधी धावा करणार?

पृथ्वी शॉ प्रमाणे मयंक अग्रवालही टीम इंडियाचा भाग होता. पण त्याला सुद्धा संघात स्थान मिळालेलं नाही. मयंक आयपीएल 2022 मध्ये पंजाब किंग्सचा कॅप्टन होता. कॅप्टनशिप आणि फलंदाजी दोघांमध्ये तो फ्लॉप ठरला. त्याला आपली छाप उमटवता आली नाही. रणजी करंडक स्पर्धेत तो कर्नाटककडून खेळतोय. उत्तर प्रदेशविरुद्ध त्यांचा सामना आहे. मयंकने 41 चेंडूचा सामना केला पण अवघ्या 10 रन्सवर आऊट झाला. मयंकला शिवम मावीने पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.

यशस्वीने चांगली सुरुवात केली, पण….

पृथ्वी शॉ चा सहकारी आणि IPL 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून फायनल खेळणारा यशस्वी जैस्वाल सुद्धा मोठी इनिंग खेळू शकला नाही. चांगली सुरुवात केली. पण 35 धावांवर तो आऊट झाला. 45 चेंडूंचा सामना करताना त्याने सहा चौकार लगावले.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.