AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shubman Gill, IPL 2022: शुभमन गिलच्या 48 धावा फक्त 10 चेंडूत, आज दाखवली क्लासिक बॅटिंग

Shubman Gill, IPL 2022: गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) सलामीवीर शुभमन गिलने (Shubman Gill) आयपीएलच 2022 च्या दुसऱ्या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावलं.

Shubman Gill, IPL 2022: शुभमन गिलच्या 48 धावा फक्त 10 चेंडूत, आज दाखवली क्लासिक बॅटिंग
ऑरेंज कॅपमध्ये पाचव्या स्थानी शुभमन गिलImage Credit source: twitter
| Updated on: Apr 02, 2022 | 9:41 PM
Share

मुंबई: गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) सलामीवीर शुभमन गिलने (Shubman Gill) आयपीएलच 2022 च्या दुसऱ्या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावलं. आज पुण्यात महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर सामना सुरु आहे. शुभमन गिलने क्लासिक बॅटिंग दाखवली. त्याने 46 चेंडूत 84 धावा फटकावल्या. दिल्लीच्या गोलंदाजांवर त्याने हल्लाबोल केला. हाणामारीच्या षटकात धावांची गती वाढवताना खलील अहमदने त्याचा विकेट काढला. गिलने 46 चेंडूत 84 धावा फटकावल्या. आयपीएलमधील (IPL) त्याची ही सर्वाधिक धावसंख्या आहे. त्याने 48 धावा तर फक्त दहा चेंडूतच केल्या. कोलकाता नाइट रायडर्सकडून गिल चार सीजन खेळला. पण गुजरातकडून खेळताना पहिल्या सामन्यात तो अपयशी ठरला होता. पहिल्याच षटकात त्याची विकेट गेली होती. आज गिलने मागचं अपयश धुवून काढलं.

प्रत्येक गोलंदाजाला लक्ष्य केलं

गिलने आज धावांचा पाऊस पाडला. मॅथ्यू वेड, विजय शंकर हे गुजरातचे फलंदाज विशेष चमक दाखवू शकले नाहीत. पण त्याने गिलला फरक पडला नाही. त्याने दिल्लीच्या प्रत्येक गोलंदाजाला लक्ष्य केलं. 2018 मध्ये डेब्यु करणाऱ्या शुभमन गिलचा हा पाचवा सीजन आहे.

अक्षर पटेलला लक्ष्य केलं

दिल्लीचा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल विरोधात गिलने खासकरुन आक्रमण केलं. त्याच्या गोलंदाजीवर गिलने तीन षटकार ठोकले. शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव आणि खलील अहमदलाही त्याने सोडलं नाही. शुभमन गिलने 32 चेंडूत आयपीएलमधील 11 वं अर्धशतक पूर्ण केलं.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.