AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 सुरु होण्याआधी विराट कोहलीच्या RCB ला बसू शकतो आणखी एक मोठा झटका

IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीगचा 16 वा सीजन सुरु होण्याआधी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. आरसीबीसाठी एक चांगली बातमी आहे. मॅक्सवेलची भारताविरुद्ध वनडे सीरीजसाठी निवड झालीय.

IPL 2023 सुरु होण्याआधी विराट कोहलीच्या RCB ला बसू शकतो आणखी एक मोठा झटका
RCB Image Credit source: social media
| Updated on: Feb 23, 2023 | 12:04 PM
Share

IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीगचा 16 वा सीजन सुरु होण्याआधी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. ग्लेन मॅक्सवेलच्या दुखापतीनंतर जोश हेझलवूड अकिलिसच्या दुखापतीमधून सावरतोय. त्यामुळे हेझलवूड आयपीएलमधील काही सामन्यांना मुकू शकतो. जोश हेझलवूड भारताविरुद्ध उर्वरित दोन कसोटी सामन्यातही खेळणार नाहीय. उपचारासाठी तो मायदेशी परतला आहे. 2 एप्रिलला RCB ची मुंबई इंडियन्स विरुद्ध पहिली मॅच होणार आहे. तो, पर्यंत हेझलवूड फिट होईल का? या बद्दल स्पष्टत नाहीय.

ऑस्ट्रेलियन टीमसाठी मोठा झटका

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियात 17 मार्चपासून वनडे सीरीज सुरु होणार आहे. हेझलवूड त्या सीरीजसाठी सुद्धा उपलब्ध नाहीय. ऑस्ट्रेलियन टीमसाठी हा सुद्धा एक मोठा झटका आहे. सुरुवातीला हेझलवूड फक्त भारताविरुद्ध एका कसोटी सामन्यात खेळणार नसल्याची माहिती होती. हेझलवूड अकिलिसच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन टीम मॅनेजमेंटने त्याला मायदेशी पाठवून दिलय.

RCB साठी एक चांगली न्यूज

आरसीबीसाठी एक चांगली बातमी आहे. मॅक्सवेलची भारताविरुद्ध वनडे सीरीजसाठी निवड झालीय. मॅक्सवेलने या तीन वनडे सामन्यात फिटनेस सिद्ध केला, तर तो आयपीएलच्या पूर्ण सीजनमध्ये खेळू शकतो. दरम्यान, 16 व्या हंगामाला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. एकूण 10 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या 10 संघाची विभागणी ही ग्रुप ए आणि ग्रुप बी अशा 2 गटांमध्ये करण्यात आली आहे. या हंगामाती सर्व सामन्यांचं आयोजन हे देशातील एकूण 12 स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. मुंबईचा या मोसमातील सलामीचा सामना हा बंगळुरु विरुद्ध खेळणार आहे. हा सामना 2 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे.

सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट.
उमेदवारीसाठी दादांकडे 5, शिंदेंकडे 10 कोटी घेतात, राऊतांचा गंभीर आरोप
उमेदवारीसाठी दादांकडे 5, शिंदेंकडे 10 कोटी घेतात, राऊतांचा गंभीर आरोप.
मुंबईत उत्तर भारतीय महापौर! BJPच्या बड्या नेत्यानं ठाकरे बंधूंना डिवचल
मुंबईत उत्तर भारतीय महापौर! BJPच्या बड्या नेत्यानं ठाकरे बंधूंना डिवचल.