AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023, GT vs CSK | टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या मराठमोळ्या खेळाडूचं चेन्नईकडून डेब्यू

आयपीएल 16 व्या मोसमातील पहिल्या सिजनच्या सामन्यातून मराठमोळ्या खेळाडूचं पदार्पण झालं आहे. या बॉलिंग ऑलराउंडरने टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून दिला आहे.

IPL 2023, GT vs CSK | टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या मराठमोळ्या खेळाडूचं चेन्नईकडून डेब्यू
| Updated on: Mar 31, 2023 | 8:27 PM
Share

अहमदाबाद | आयपीएल 16 व्या मोसमातील सलामीचा सामना हा गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवण्यात येतोय. या सामन्यात गुजरातने टॉस जिंकला. कॅप्टन हार्दिक पंड्या याने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. या सामन्यातून मराठमोळ्या बॉलिंग ऑलराउंडरने चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं आहे. या खेळाडूला आयपीएलच्या 15 व्या मोसमात पदार्पणाची संधी मिळाली नव्हती. मात्र अखेर या मोसमातील पहिल्याच सामन्यात टीम मॅनेजमेंटने विश्वास दाखवत डेब्युची संधी दिली आहे.

महाराष्ट्रातील तुळजापूरच्या बॉलिंग ऑलराउंडर असलेल्या राजवर्धन हंगरगेकर यांचं आयपीएल डेब्यू झालं आहे. त्यामुळे हंगरगेकर कुंटुबियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. टीम इंडियाने 2022 मध्ये अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला होता. यामध्ये राजवर्धन याने मोलाची भूमिका बजावली होती.

चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, मोईन अली, रविंद्र जडेजा, शिवम दुबे, दीपक चहर, मिचेल सँटनर आणि राजवर्धन हंगरगेकर

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), केन विल्यमसन, विजय शंकर, राहुल तेवतिया, आर खान, मोहम्मद शमी, जोशवा लिटल, वाय दयाल आणि अल्जारी जोसेफ.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...