AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 : चेन्नईला मोठा झटका, कॅप्टन कूल खेळणार नाही, कारण काय?

आयपीएलच्या 16 व्या मोसमाला सुरुवात होण्यासाठी अजून बराच वेळ बाकी आहे. मात्र त्याआधी चेन्नईच्या चाहत्यसाांठी वाईट बातमी समोर आली आहे.

IPL 2023 : चेन्नईला मोठा झटका, कॅप्टन कूल खेळणार नाही, कारण काय?
| Updated on: Jan 18, 2023 | 10:27 PM
Share

मुंबई : आयपीएलच्या 16 व्या मोसमासाठी 23 डिसेंबर रोजी मिनी ऑक्शन पार पडलं. पुन्हा एकदा खेळाडूंची अदलाबदल झाली. आयपीएलच्या 16 व्या मोसमात पुन्हा एकदा 10 संघात चुरस पाहायला मिळणार आहे. मात्र अजून 16 व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर झालेलं नाही. मात्र याआधी चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. चेन्नईचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी याच्याबाबत ही बातमी आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, धोनीला मोसमातील पहिल्या 3-4 सामन्यांना मुकावं लागू शकतं. यामुळे चेन्नई समर्थकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. धोनीला पहिल्या 3-4 सामन्यात का खेळता येणार नाही, याबाबत आपण जाणून घेऊयात.

चेन्नई आयपीएलच्या इतिहासातील यशस्वी टीमपैकी एक आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने यशस्वी कामगिरी केली आहे. काही महिन्यांचा अपवाद वगळता धोनी चेन्नईचं नेतृत्व करतोय. त्यामुळे धोनी चेन्नईचा जीव आहे, असं म्हटलं जातं. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार, धोनीला मोसमातील पहिल्या 4 सामन्यांना मुकावं लागू शकतं. त्याचं कारण म्हणजे धोनीला असलेला पाठदुखीचा त्रास.

धोनीला पाठदुखीचा त्रास सतावतोय. डॉक्टरांनी धोनीला 2 ते अडीच महिने क्रिकेटपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. जर मीडिया रिपोर्ट्सनुसार करण्यात आलेला दावा खरा ठरला तर धोनी चाहत्यांसाठी तो धक्का असेल. मात्र धोनी लवकरात लवकर बरा होऊन पहिल्या सामन्यापासून टीमसाठी खेळावा, अशी आशा आणि इच्छा धोनी चाहत्यांना आहे.

चेन्नई सुपर किंग्स टीम

बॅट्समन : एमएस धोनी (कॅप्टन/विकेटकीपर), डेवोन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायडू, सुभ्रांशु सेनापति, शैक रशीद, अजिंक्य रहाणे, मोइन अली , शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जाडेजा, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, बेन स्टोक्स, कायले जॅमीन्सन, अजय मंडल, भगत वर्मा आणि निशांत सिंधु.

बॉलर : दीपक चाहर, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथीशा पथिराना, सिमरजीत सिंह, प्रशांत सोलंकी आणि महेश थीक्षणा.

हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने
हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने.
महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले
महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले.
मलाड रेल्वे स्थानकातील हत्या प्रकरणाचा नवा CCTV समोर
मलाड रेल्वे स्थानकातील हत्या प्रकरणाचा नवा CCTV समोर.
मालाड रेल्वेस्थानक हत्या प्रकरण; आरोपीला अटक, काय होणार शिक्षा?
मालाड रेल्वेस्थानक हत्या प्रकरण; आरोपीला अटक, काय होणार शिक्षा?.
डोंबिवलीत मराठी मुलीच्या एकाच स्टॉलवर कारवाई, नेमकं काय घडलं?
डोंबिवलीत मराठी मुलीच्या एकाच स्टॉलवर कारवाई, नेमकं काय घडलं?.
मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर
मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर.
संजय राऊतांचा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर खटल्यात दिरंगाईचा आरोप
संजय राऊतांचा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर खटल्यात दिरंगाईचा आरोप.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक.
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी.
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका.