IPL 2023 | आयपीएलच्या 16 व्या मोसमाआधी या टीमसाठी गूडन्यूज, 2 स्टार खेळाडूंची एन्ट्री

आयपीएलच्या 16 व्या मोसमाला ही अवघ्या काही दिवसांमध्ये 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी आयपीएलमधील यशस्वी टीममध्ये 2 मॅचविनर ऑलराउंडर्स खेळाडूंची एन्ट्री झाली आहे.

IPL 2023 | आयपीएलच्या 16 व्या मोसमाआधी या टीमसाठी गूडन्यूज, 2 स्टार खेळाडूंची एन्ट्री
IPL 2023
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 8:49 PM

मुंबई | मुंबई इंडियन्स ही आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबईने स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक 5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा नंबर लागतो. चेन्नईने मुंबईनंतर सर्वाधिक 4 वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. आयपीएलच्या 16 व्या मोसमाला येत्या 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या मोसमातील सलामीचा सामना हा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गतविजेत्या गुजरात यांच्यात खेळवण्यात येणार आहे. त्याआधी चेन्नईसाठी सर्वात मोठी आणि तितकीच आनंदाची बातमी समोर आली आहे. टीममध्ये 2 घातक मॅचविनर ऑलराउंडर खेळाडूंची एन्ट्री झाली आहे.

चेन्नई टीममध्ये इंग्लंडचा बेन स्टोक्स आणि मोईन अली या 2 ऑलराउंडर्स खेळाडूंची एन्ट्री झालीय. चेन्नईने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. “प्रतिक्षा संपली” या कॅप्शनसह हे ट्विट केलं आहे.

हे सुद्धा वाचा

बेन स्टोक्स याची आकडेवारी

बेन स्टोक्स हा घातक ऑलराउंडर्सपैकी एक आहे. बेन स्टोक्स आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 43 सामने खेळला आहे. यात त्याने 920 धावा केल्या आहेत. यात स्टोक्सने 2 शतकं ठोकली आहेत. तसेच 28 विकेट्स घेतल्या आहेत. स्टोक्स याला न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत दुखापतीने ग्रस्त होता. स्टोक्स याला दुखापतीमुळे आयपीएलच्या या 16 व्या मोसमातील सुरुवातीच्या टप्प्याला मुकावं लागणार असल्याची चर्चा होती. मात्र स्टोक्स याच्या कमबॅकमुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळालं आहे.

मोईन अली

मोईन अली याने आयपीएलमध्ये 44 सामन्यात 910 धावा केल्यात, यामध्ये 5 अर्धशतकंचा समावेश आहे. मोईल अली याची 76 ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. तसेच मोईन याने 24 विकेट्स घेतल्या आहेत. चेन्नईसाठी आयपीएलचा 15 वा मोसम हा फार निराशाजनक ठरला होता. तसेच कॅप्टन महेंद्रसिंह धोनी याचा हा अखेरचा मोसम असल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे चेन्नई टीम यंदा शानदार कामगिरी करत धोनीला विजयी निरोप देण्याचा प्रयत्नात असणार आहे.

चेन्नईत स्टार खेळाडूंची एन्ट्री

चेन्नई आयपीएलमधील यशस्वी टीम

चेन्नई ही आयपीएलमधील सर्वात दुसरी यशस्वी कर्णधार आहे. महेंद्रसिंह धोनीने आपल्या नेतृत्वात टीमला 4 वेळा चॅम्पियन केलं आहे. धोनीने चेन्नईला 2010, 2011, 2018 आणि 2021 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे.

चेन्नई सुपर किंग्स टीम

महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश तीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.