AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK vs LSG : मोईन अली नाही, चाहत्यांच्या मते हा खेळाडू ‘मॅन ऑफ द मॅच’चा खरा दावेदार, अन्याय झाला?

CSK vs LSG : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध खेळणाऱ्या मोईन अलीची 'मॅन ऑफ द मॅच'च्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पण चेन्नई सुपर किंग्सचा दुसरा खेळाडू खरंतर या पुरस्कारासाठी दावेदार होता.

CSK vs LSG : मोईन अली नाही, चाहत्यांच्या मते हा खेळाडू 'मॅन ऑफ द मॅच'चा खरा दावेदार, अन्याय झाला?
moeen aliImage Credit source: instagram
| Updated on: Apr 04, 2023 | 7:56 AM
Share

CSK vs LSG IPL 2023 : महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने सोमवारी लखनौ सुपर जायंट्स टीमचा 12 धावांनी पराभव केला. गुजरात टायटन्स विरुद्ध पहिला सामना 5 विकेट्सने गमावल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने जबरदस्त कमबॅक केलं. चेन्नईचा आयपीएल 2023 मधील हा पहिला विजय आहे. चेन्नई सुपर किंग्सला लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध 12 धावांनी विजय मिळवून देण्य़ासाठी CSK चा ऑलराऊंडर मोईन अलीची मॅन ऑफ द मॅच पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

मोईन अलीने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध घातक गोलंदाजी केली. त्याने 4 ओव्हर्समध्ये 26 धावा देऊन 4 विकेट्स काढल्या. मोईन अलीला यासाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. चेन्नईमध्ये सीएसके विरुद्ध LSG सामना झाला. खरंतर मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी मोईन अली नाही, चेन्नईचा दुसरा एक मोठा खेळाडू दावेदार होता. मोईन अली समोर त्या खेळाडूच्या कामगिरीकडे कोणाच लक्ष गेलं नाही. तो खेळाडू नसता, तर चेन्नई सुपर किंग्सचा पराभव निश्चित होता.

सरळसरळ अन्याय

चेन्नई सुपर किंग्सच्या या प्लेयरवर सरळसरळ अन्याय झाला. चेन्नई सुपर किंग्सला स्वबळावर विजय मिळवून देणाऱ्या या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला नाही. चेन्नई सुपर किंग्सचा हा स्टार प्लेयर स्वत: कॅप्टन एमएस धोनी आहे. या मॅचमध्ये धोनीने तुफान बॅटिंग केली. त्याने 3 चेंडूत 12 धावा फटकावल्या. धोनीच्या या छोट्या इनिंगमध्ये 2 सिक्स होत्या. त्या 12 धावा निर्णायक

चेन्नई सुपर किंग्सने सोमवारी लखनौ सुपर जायंट्स टीमला 12 धावांनी हरवलं. अखेरीस धोनीची 12 धावांची खेळी चेन्नईच्या विजयात महत्वपूर्ण ठरली. लखनौ विरुद्ध धोनीने अखेरीस 3 चेंडूत 12 धावा फटकावल्या नसत्या, तर चेन्नईचा पराभव सुद्धा झाला असता. चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्सच्या जय-पराजयामध्ये धोनीच्या त्या 12 धावा निर्णायक ठरल्या. चेन्नईने पहिली बॅटिंग करताना सात विकेटवर 217 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौ टीमने 20 ओव्हर्समध्ये 7 विकेट गमावून 205 धावा केल्या.

Follow Us
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ