AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yashasvi Jaiswal : दिलदार मनाचा सूर्यकुमार, यशस्वीसाठी चालू मॅचमध्ये ट्विट करत म्हणाला…

Suryakumar Yadav Twit for Jaiswal : युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल याने नाबाद 98 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. पठ्ठ्याचं अवघ्या दोन धावांनी शतक हुकलं खरं पण शतकापेक्षा शानदार त्याने खेळी केली.

Yashasvi Jaiswal : दिलदार मनाचा सूर्यकुमार, यशस्वीसाठी चालू मॅचमध्ये ट्विट करत म्हणाला...
| Updated on: May 11, 2023 | 11:35 PM
Share

मुंबई : कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये झालेल्या सामन्यामध्ये राजस्थान संघाने एकतर्फी विजय मिळवला आहे. सर्वात खास म्हणजे युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल याने नाबाद 98 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. पठ्ठ्याचं अवघ्या दोन धावांनी शतक हुकलं खरं पण शतकापेक्षा शानदार खेळी त्याने केली. बहादूर खेळाडूवर दिग्गज खेळाडू कौतुकाचा वर्षाव करत आहेत. अशातच मिस्टर 360 प्लेअर सूर्यकुमार यादव यानेही यशस्वीसाठी खास ट्विट केलं आहे.

यशस्वी जयस्वाल मैदानाता कोलकाता संघाच्या खेळाडूंना फोडत होता. भावाने अवघ्या 13 बॉलमध्ये अर्धशतक करत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात फास्ट हाल्फ सेंच्युरी केली. मैदानात बॅटींग करत असताना सूर्याने ट्विट केलं. स्पेशल खेळी, स्पेशल खेळाडूकडून असं म्हणत यशस्वी जयस्वाल याला त्याने टॅग केलंय. सूर्याचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलं दिसत आहे.

राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सला 9 गडी राखून पराभूत केलं. कोलकात्याने विजयासठी दिलेल्या धावा कमी षटकात पूर्ण केल्याने राजस्थानच्या नेट रनरेटमध्येही जबरदस्त फरक पडला आहे. कोलकात्याने 20 षटकात 8 गडी गमवून 149 धाव केल्या आणि विजयासाठी 150 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान राजस्थानने 13.1 षटकात पूर्ण केलं. या विजयासह राजस्थानने टॉप 4 मध्ये स्थान मिळवलं आहे.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन | संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, केएम आसिफ आणि युझवेंद्र चहल.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कॅप्टन), रहमानुउल्लाह गुरबाज (विकेटकीपर), जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, अनुकुल रॉय, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.

मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.