AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 MI vs LSG Eliminator : मानलं रे पठ्ठ्या, आकाश मढवाल याने आयपीएलमध्ये रचला इतिहास

आजच्या विजयामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका आकाश मधवाल या युवा खेळाडूने बजावली. या पठ्ठ्याने फक्त मुंबईला विजयच नाही मिळवून दिला नाहीतर आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आपलं नाव सुवर्ण अक्षराने लिहिलं आहे.

IPL 2023 MI vs LSG Eliminator : मानलं रे पठ्ठ्या, आकाश मढवाल याने आयपीएलमध्ये रचला इतिहास
| Updated on: May 25, 2023 | 12:29 AM
Share

मुंबई : मुंबई इंडिअन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यामधील सामन्यामध्ये मुंबईने 81 धावांनी मोठा विजय मिळवला आहे. मुंबई प्ले-ऑफमध्ये जाईल की नाही हे नक्की नव्हतं मात्र एक संधी मिळाल्यावर पाच वेळा चॅम्पिअन असणाऱ्या पलटणने त्या संधीचं सोन केलेलं आहे. मुंबईने दिलेल्या 183 धावांचा पाठलाग करताना लखनऊ संघ 101 धावांवर ऑल आऊट झाला. या विजयासह मुंबईला आता फायनलपासून एक पाऊल दूर आहे. तर आजच्या विजयामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका आकाश मधवाल या युवा खेळाडूने बजावली.

आकाश मधवाल याने पाज विकेट्स घेतल्या त्यासह एक रनआऊटही केला. या पठ्ठ्याने फक्त मुंबईला विजयच नाही मिळवून दिला नाहीतर आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आपलं एक नाव सुवर्ण अक्षराने लिहिलं आहे. आकाशने या प्ले-ऑफ सामन्यामध्ये पाच विकेट घेतल्या, याआधी एकाही खेळाडूला अशी चमकदार कामगिरी करता आली नाही.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे आकाश मढवाल हा अनकॅप खेळाडू असल्याने त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. आकाश मढवाल याने आपल्या 4 ओव्हरमध्ये फक्त 5 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. मागील 4 सामन्यामध्ये त्याने 12 विकेट्स घेतल्या आहेत. उत्तराखंडकडून आयपीएल खेळणारा हा तो पहिलाच खेळाडू आहे.

दरम्यान, आकाश मढवाल याने रोहित शर्माचं कौतुक केलं. रोहित मला आत्मविश्वास वाढवण्यास खूप मदत करतो. गुजरातसाठी आणखी कष्ट घेईल आणि संघासाठी जास्तीत जास्त योगदान देण्याचा प्रयत्न करेलं असं आकाश मढवाल याने सामना संपल्यानंतर सांगितलं.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, ख्रिस जॉर्डन, हृतिक शोकीन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ आणि आकाश मधवाल.

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | कृणाल पांड्या (कॅप्टन), आयुष बडोनी, दीपक हुडा, प्रेरक मंकड, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृष्णप्पा गौथम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, यश ठाकूर आणि मोहसीन खान.

विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.