AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 MI : टिम डेविडच्या जबरदस्त खेळीने मुंबई इंडियन्सचा विजय, पण चार वर्षांपूर्वी असं काय झालं होतं की..

MI vs RR : राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या टिम डेविडची बॅट चांगलीच तळपली. राजस्थान विरुद्ध त्याने 14 चेंडूत नाबाद 45 धावांची खेळी केली. पण टिम डेविडला हे कसं शक्य झालं जाणून घ्या.

IPL 2023 MI : टिम डेविडच्या जबरदस्त खेळीने मुंबई इंडियन्सचा विजय, पण चार वर्षांपूर्वी असं काय झालं होतं की..
IPL 2023 MI : टिम डेविडच्या आक्रमक खेळीचं गुपित काय? चार वर्षांपूर्वी काय घडलं होतं की झाला इतका बदलImage Credit source: BCCI/IPL
| Updated on: May 01, 2023 | 3:27 PM
Share

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात रोमांचक सामना क्रीडाप्रेमींना बघायला मिळाला. शेवटच्या कोण बाजी मारणार? अशी धाकधूक लागली असताना टिम डेविड नावाचं वादळ घोंगावलं आणि मुंबईला विजय मिळवून दिला. टिम डेविने 14 चेंडूत नाबाद 45 धावांची खेळी केली आणि राजस्थान रॉयल्सच्या विजयाचा घास हिरावून घेतला. शेवटच्या षटकात 17 धावांची आवश्यकता असताना टिम डेविडने सलग तीन षटकार ठोकले आणि सामना जिंकवला. त्याच्या विजयी खेळीनंतर टिम डेविडने सहज असे षटकार कसे ठोकले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गोलंदाजाची एक चूक आणि टिम डेविडचा उत्तुंग षटकार असं कसं होतं ते जाणून घ्या.

आयुष्याचं यशाचं गणित कायम तसंच राहात नाही. कधी कधी अपयशही पचवावं लागतं. असं काहीसं टिम डेविडच्या बाबतीत घडलं आहे. सहा वर्ष अपयश पचवत टिम डेविड एक वेगळंच व्यक्तिमत्त्व म्हणून समोर आले आहे. टिम डेविडने सिक्स मशीन म्हणून प्रसिद्धी मिळवण्यामागेही एक खास कारण आहे.

चार वर्षांपूर्वी झालेली घटना मनाला लागली

टिम डेविडला आजपासून चार वर्षापूर्वी म्हणजेच 2019 मध्ये वेदना सहन कराव्या लागल्या होत्या. टिम डेविड वेस्टर्न ऑस्ट्रेलियासाठी खेळत होता. पण चार वर्षापूर्वी त्याचा कॉन्ट्रॅक्ट वाढवण्यात आला नाही. कारण त्याचं कामगिरी हवी तशी नव्हती. तसेच 2019 पूर्वी तो दुखापतग्रस्त होता. त्यामुळे त्याला अतीव दु:ख झालं. त्यानंतर पुनरागमन करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले.

अमेरिकन गोल्फरला पाहून बदलली बॅटिंग स्टाईल

टिम डेविडेने आपल्या फलंदाजीत काही बदल केले. 2019 मध्ये हिवाळ्यापासून त्याने हा बदल करण्यास सुरुवात केली. अमेरिकन गोल्फर डेंचब्यूला पाहात त्याने गोल्फ स्विंग कॉपी करण्यास सुरुवात केली. ब्रायसन डेचंब्यू गोल्फच्या इतिहासातील सर्वात जबरदस्त शॉट मारणारा खेळाडू आहे. त्याचा स्विंग जबरदस्त आहे. त्याने 2020 मध्ये यूएस ओपन किताब जिंकला होता.

टिम डेविडने डेचंब्यू प्रमाणे आपली बॅट फिरवण्यास सुरुवात केली.हा सराव करता करता त्याला लय सापडली. डेविडच्या डोक्यात फक्त चेंडू सीमापार पोहोचवणं इतकंच होतं. गोल्फर ब्रायसन डेचंब्यूच्या स्टाईलचा टिम डेविडला फायदा झाला. तशा पद्धतीने केलेल्या फटकेबाजीमुळे चेंडू 10 ते 20 मीटर लांब जाऊ लागला.

तसेच यासाठी चेंडू बॅटच्या मधोमध लागण्याची काहीही गरज भासत नव्हती. फक्त बॅट जोरात फिरवली की चेंडू मध्ये लागो या ना लागो चेंडू थेट सीमारेषेपार जात होता. टिम डेविडने यात काही बदल केले. इतकंच काय तर सिंगापूरसाठी खेळणाऱ्या टिम डेविडचा ऑस्ट्रेलियाने टी 20 वर्ल्डकप 2022 मध्ये समावेश केला. आता टीम डेविड आपल्या फलंदाजीने सर्वांच लक्ष वेधून घेत आहे.

Follow Us
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?