IPL 2023 : टीम इंडियामध्ये कमबॅक करण्यासाठी दिल्लीच्या छाव्याची बॅट तळपलीच, पाहा कोण आहे?

PBKS vs DC IPL 2023 : या खेळाडूल परत एकदा टीम इंडियामध्ये परतण्यासाठी आयपीएल एकप्रकारे शिडीसारखी होती. मात्र यंदाच्या सीझनमध्ये त्याला आपली छाप पाडता आली नव्हती. अखेर पर्व संपताना त्याने फिफ्टी ठोकलीच.

IPL 2023 : टीम इंडियामध्ये कमबॅक करण्यासाठी दिल्लीच्या छाव्याची बॅट तळपलीच, पाहा कोण आहे?
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 10:49 PM

मुंबई : दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यामध्ये दिल्लीचा आक्रमक खेळाडू फॉर्ममध्ये परतला आहे. या खेळाडूल परत एकदा टीम इंडियामध्ये परतण्यासाठी आयपीएल एकप्रकारे शिडीसारखी होती. मात्र यंदाच्या सीझनमध्ये त्याला आपली छाप पाडता आली नव्हती. दिल्लीचा संघ आता आयपीएलमधून बाहेर पडला असून आजच्या सामन्यात या खेळाडूने पहिलं अर्धशतक ठोकलं आहे.

कोण आहे हा खेळाडू?

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून युवा पृथ्वी शॉ आहे. सुरूवातील देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याला खेळताना पाहिल्यावर अनेकांना सचिनसारखी झलक त्याच्या बॅटीगंमध्ये पाहायला मिळाली. निवड समितीनेही त्याला अनेक संधी दिल्या परंतु तो अपयशी झाल्यावर संघातून डच्चू देण्यात आला होता.

आजच्या सामन्यात पृथ्वी शॉने 38 चेंडूत 54 धावांची  खेळी केली. यामध्ये त्याने 7 चौकार आणि 1 षटकार मारला. दिल्लीला ज्या प्रकारच्या सुरूवातीची अपेक्षा होती तशाप्रकारती फलंदाजी शॉने केली.  सुरूवातीच्या काही सामन्यांमध्ये तो अपयशी ठरल्याने त्याला संघाबाहेर ठेवलं होतं. मात्र आज परत एकदा टीम व्यवस्थापनाने त्याला संधी दिली आणि त्याने करून दाखवलं.

पृथ्वीने जसा आज खेळ केला तसा त्याने आधीच केला असता तर दिल्लीसाठी फायद्याचं राहिलं असतं. आयपीएल कारकिर्दीतील हे तेरावे अर्धशतक आहे. मात्र, शॉ फिफ्टी पूर्ण केल्यानंतर तो जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही. 15व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सॅम करनने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 2 गडी गमवून 213 धावा केल्य आहेत. रिली रोसो नाबाद 82 धावा आणि पृथ्वी शॉ 54  यांनी सर्वाधिक धावांची खेळी केली.

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (कर्णधार), अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, कागिसो रबाडा, नॅथन एलिस, अर्शदीप सिंग

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), रिली रोसो, अक्षर पटेल, अमन हकीम खान, यश धुल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा, खलील अहमद

Non Stop LIVE Update
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.