AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PBKS vs MI : मुंबई उधार ठेवत नाही, पंजाबवर विजय मिळवत केला हिसाब बराबर!

वानखेडे स्टेडिअमवर केलेल्या पराभवाचा बदला पलटणने घेतलाच. पंजाब किंग्जने दिलेल्या 215 धावांचा डोंगर सर केलाच.

PBKS vs MI : मुंबई उधार ठेवत नाही, पंजाबवर विजय मिळवत केला हिसाब बराबर!
| Updated on: May 03, 2023 | 11:43 PM
Share

मुंबई : पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडिअन्समध्ये झालेल्या सामन्यामध्ये मुंबई संघाने पंजाबवर 6 विकेट्स आणि 7 चेंडू राखून विजय मिळवला आहे. वानखेडे स्टेडिअमवर केलेल्या पराभवाचा बदला पलटणने घेतलाच. पंजाब किंग्ज संघाने निर्धारित 20 षटकात 3 गडी गमावत 214 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरूवात खराब झाली होती. रोहित शर्मा शून्यावर बाद झाला होता. त्यामुळे डोंगराएवढं लक्ष्य पूर्ण होईलं वाटत नव्हतं. मात्र सूर्यकुमार यादव, ईशान किशन आणि तिलक वर्मा यांच्या खरतनाक बॅटींगच्या जोरावर मुंबईने विजय मिळवला आहे.

पंजाबने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरूवात निराशाजनक झाली. ऋषी धवन याने रोहितला शून्यावर आऊट केलं होतं. त्यानंतर ग्रीन फलंदाजीला आला मात्र 23 धावांवर तोसुद्धा आऊट झाला.  ग्रीन आऊट झाल्यावर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या सूर्यकुमार यादवने वादळी खेळी केली.  दुसरीकडे  ईशान किशन यानेही एक बाजू लावून धरली होती. दोघांनी अनुक्रमे 75 धावा आणि 66 धावा केल्या.

ईशान आणि सूर्याने शतकी भागीदारी करत दोघांनी अर्धशतके केलीत. मात्र दोघेही पाठोपाठ आऊट झाले.  मागील सामन्यामधील मॅचविनर तिलक वर्मा आणि टीम डेविड हे दोगे मैदानात होते. ज्या अर्शदीप सिंहने स्टम्प मोडले होते त्यालाच वर्माने फोडलं.  10 बॉलमध्ये त्याने  नाबाद 23 धावा केल्या, यामध्ये 3 सिक्सर आणि 1 चौकार मारला. या विजयासह मुंबईने आपला हिशोब बराबर केला आहे.

पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): प्रभसिमरन सिंग, शिखर धवन (C), मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (w), सॅम कुरान, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, राहुल चहर, अर्शदीप सिंग

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), इशान किशन (डब्ल्यू), कॅमेरॉन ग्रीन, टिळक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्शद खान

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.