AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 : Mumbai Indians साठी ‘हा’ खेळाडू ठरु शकतो मोठा विलन

IPL 2023 : मुंबई इंडियन्सला हा खेळाडू बुडवू शकतो. 2021 मध्ये शेवटचा आयपीएल सामना खेळला होता. त्यानंतर 2022 साली मुंबई इंडियन्स टीमने त्याला विकत घेतलं.

IPL 2023 : Mumbai Indians साठी 'हा' खेळाडू ठरु शकतो मोठा विलन
Mumbai indians Image Credit source: instagram
| Updated on: Mar 30, 2023 | 3:32 PM
Share

Mumbai Indians News : IPL 2023 ची सुरुवात 31 मार्चपासून होत आहे. आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध होणार आहे. 2 एप्रिलला पहिली मॅच होईल. मुंबई इंडियन्स आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबई इंडियन्सने पाचवेळा आयपीएलच विजेतेपद पटकावलं आहे. IPL 2023 मध्ये सर्वात जास्त चर्चा मुंबई इंडियन्सच्या टीमची आहे. मुंबईच्या टीममध्ये एक फ्लॉप खेळाडू सुद्धा आहे. आयपीएलमध्ये हा फ्लॉप खेळाडू मुंबई इंडियन्सच्या टीमसाठी मोठा विलन ठरु शकतो.

IPL 2023 मध्ये मुंबई इंडियन्सने या खेळाडूला टीममध्ये ठेऊन कदाचित आपल्या पायावर कुऱ्हाड मारली आहे. हा खेळाडू मुंबई इंडियन्सच्या पराभवाला कारण ठरु शकतो. हा प्लेयर पीयूष चावला आहे. यंदाच्या सीजनमध्ये सर्व टीम्सच्या तुलनेत मुंबई इंडियन्स स्पिन बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये कमकुवत आहे. मुंबई इंडियन्सकडे अनुभवी फिरकी गोलंदाज म्हणून पीयूष चावला आहे.

ठरु शकतो सर्वात मोठा विलन

आयपीएल 2023 मध्ये पीयूष चावला मुंबई इंडियन्स टीमसाठी सर्वात मोठा विलन ठरु शकतो. पीयूष चावलाबद्दल बोलायच झाल्यास, त्याने वर्ष 2021 नंतर आयपीएल सामना खेळलेला नाही. पीयूष चावला चेन्नई सुपर किंग्ससाठी 2021 मध्ये शेवटचा आयपीएल सामना खेळला होता. त्यानंतर 2022 साली पीयूष चावलला मुंबई इंडियन्स टीमने विकत घेतलं. पण त्याला संधी मिळाली नाही. आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची टीम प्लेऑफमद्ये पोहोचू शकली नाही. कारण त्यांच्याकडे चांगल्या स्पिनरची कमतरता होती. IPL 2023 साठी मुंबई इंडियन्सची टीम

रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, जोफ्रा आर्चर, टिम डेविड, मोहम्मद अरशद खान, रमनदीप सिंह, ऋतिक शौकीन, अर्जुन तेंडुलकर, ट्रिस्टन स्टब्स, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल, कॅमरून ग्रीन, झाए रिचर्डसन, पीयूष चावला, डुआन जॉनसन, विष्णु विनोद, शम्स मुलानी, नेहल वढेरा, राघव गोयल.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...