AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 Playoff Scenario : 7 मॅच पूर्ण, 7 बाकी, 10 टीम्ससाठी कसा असेल प्लेऑफचा मार्ग? MI कितपत संधी?

IPL 2023 Playoff Scenario : समजून घ्या प्लेऑफ पर्यंतचा कसा असेल सीन?. कुठली टीम पुढे, कुठली टीम मागे, ते जाणून घ्या. मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची कितपत संधी आहे? ते जाणून घ्या.

IPL 2023 Playoff Scenario : 7 मॅच पूर्ण, 7 बाकी, 10 टीम्ससाठी कसा असेल प्लेऑफचा मार्ग? MI कितपत संधी?
IPL 2023
| Updated on: Apr 26, 2023 | 1:53 PM
Share

IPL 2023 Playoff Scenario : IPL 2023 चा निम्मा सीजन पूर्ण झालाय. एकूण 70 पैकी 35 सामने खेळून पूर्ण झालेत. ग्रुप स्टेजमध्ये एकूण 14 सामने खेळले जाणार आहेत. त्यात 10 टीम्सचे निम्मे सामने बाकी आहेत. म्हणजे 7 सामने खेळून पूर्ण झालेत. अशावेळी पॉइंट्स टेबलवर एक नजर मारा. प्लेऑफच्या शर्यतीत कुठली टीम कुठल्या स्थानावर आहे, ते पॉइंट्स टेबलमधून समजेल.

प्लेऑफसाठी कुठल्या टीमची दावेदारी मजबूत आहे? कुठली टीम मागे पडतेय? काय करण्याची गरज आहे? ते लक्षात येईल.

अशी आहे स्थिती?

IPL 2023 च्या निम्म्या प्रवासात पॉइंट्स टेबलमध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सची टीम टॉपवर आहे. त्यानंतर हार्दिक पंड्याची गुजरात टायटन्स दुसऱ्या नंबरवर आहे. राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स टॉप 4 मध्ये कायम आहेत.

प्रत्येक 5 मॅच जिंकणाऱ्या दोन टीम कुठल्या?

पॉइंट्स टेबलमध्ये टॉप 4 मध्ये असलेलल्या टीम्स IPL 2023 च्या प्लेऑफमध्ये पोहोचतील. म्हणजे सध्या चेन्नई, गुजरात, राजस्थान आणि लखनौ सर्वात पुढे आहे. चेन्नई आणि गुजरातने 7 पैकी प्रत्येकी 5-5 मॅचेस जिंकल्यात. त्यांचे 10 पॉइंट्स आहेत. रनरेट चांगला असल्यामुळे CSK पहिल्या स्थानावर आहे. GT दुसऱ्या नंबरवर आहे.

समान पॉइंट् असूनही एक पाऊल पुढे

राजस्थान आणि लखनौची टीम तिसऱ्या, चौथ्या नंबरवर आहे. दोन्ही टीम्सनी आतापर्यंत 7 पैकी प्रत्येकी 4 सामने जिंकलेत. त्यांचे 8 पॉइंट्स आहेत. चांगल्या रनरेटमुळे LSG पेक्षा RR एक पाऊल पुढे आहे.

बँगलोर, पंजाब मागे नाही

IPL 2023 च्या पॉइंट्स टेबलमध्ये RCB आणि पंजाब किंग्सची टीम 5 व्या व 6 व्या नंबरवर आहे. दोघांचे 8-8 पॉइंट्स आहेत. या दोन टीम्सनी सुद्धा 7 पैकी प्रत्येकी 4-4 सामने जिंकलेत. रनरेटमुळे फक्त पोजिशनमध्ये फरक आहे.

संघमॅचविजय पराभवगुणएनआरआर
गुजरात टायटन्स1410420+0.820
चेन्नई सुपर किंग्स148517+0.652
लखनऊ सुपर जायंट्स 148517+0.284
मुंबई इंडियन्स 148616-0.044
राजस्थान रॉयल्स147714+0.148
आरसीबी 137614-0.128
केकेआर146812-0.229
पंजाब किंग्स146812-0.304
दिल्ली कॅपिटल्स145910-0.808
सनरायजर्स हैदराबाद 134908-0.558
मुंबई इंडियन्सकडे अजूनही संधी

मुंबई इंडियन्सची टीम या सीजनमध्ये निराशाजनक प्रदर्शन करतेय. पॉइंट्स टेबलवर त्याचा परिणाम दिसून येतोय. 7 पैकी फक्त 3 सामने जिंकून ही टीम 7 व्या नंबरवर आहे. मुंबई इंडियन्सची टीम आता भले खाली दिसतेय, पण त्यांच्याकडे अजून 7 सामने बाकी आहेत. उर्वरित सीजनमध्ये प्रदर्शनाचा स्तर उंचावला, तर मुंबई इंडियन्सची टीम प्लेऑफमध्ये दिसेल. कोलकाता, हैदराबाद आणि दिल्लीची टीम प्रत्येकी 4 पॉइंट्ससह 8 व्या, 9 व्या आणि 10 व्या नंबरवर आहे. त्यांच्यामध्ये रनरेटच अंतर आहे.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.