AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Tendulkar : आरसीबीने 212 धावा केल्या, पण सचिन तेंडुलकरचं ‘हे’ ट्विट पाहिलं नव्हतं वाटतं, मग काय…

सामना आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहिला मात्र क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने या सामन्याचा निकाल आरसीबीची बॅटींग झाल्यावरच सांगितला होता.

Sachin Tendulkar : आरसीबीने 212 धावा केल्या, पण सचिन तेंडुलकरचं 'हे' ट्विट पाहिलं नव्हतं वाटतं, मग काय...
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Apr 11, 2023 | 2:23 AM
Share

मुंबई : आरसीबी आणि लखनऊ यांच्यामधील पार पडलेला सामना अत्यंत रोमांचक झालेला पाहायला मिळाला. सामन्यामध्ये अनेकवेळा पारडं आरसीबीच्या बाजूने तर काही वेळा पारडं हे लखनऊ संघाच्या बाजूने झुकलं.  मात्र अंतिम चेंडूपर्यंत गेलेल्या सामन्यात लखनऊ संघाने थरारक असा विजय मिळवला. हा सामना आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहिला मात्र क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने या सामन्याचा निकाल आरसीबीची बॅटींग झाल्यावरच सांगितला होता.

विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसच्या सलामीच्या भागीदारीमुळे ग्लेन मॅक्सवेल आणि कंपनीला मोठ्या धावसंख्येसाठी एक उत्तम लॉन्च पॅड मिळाला. मात्र मला वाटत नाही की चिन्नास्वामीमध्ये 210 धावा देखील सुरक्षित नाहीत, असं सचिन तेंडुलकरने आरसीबीची बॅटिंग झाल्यावरच सांगितलं होतं. सचिनने सांगितल्याप्रमाणे आरसीबीला 212  धावा करूनही विजय मिळवता आला नाही.

चिन्नास्वामी स्टेडिअमध्ये याआधीही आरसीबीला अनेकवेळा मोठी धावसंख्या उभारूनही पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यामध्ये तर गोलंदाजांनी सुरूवात एकदम झकास केली होती. मात्र त्यानंतर मार्कस स्टॉयनिस आणि निकोलस पूरन यांनी केलेल्या घातक फलंदाजीच्या जोरावर लखनऊ संघाने विजय मिळवला.

सुरुवातीच्या तीन विकेट्स लखनऊ संघाने अवघ्या 23 धावांवर गमावल्या होत्या. मात्र स्टॉयनीसने केलेल्या 62 धावांच्या खेळीनंतर मैदानात उतरलेल्या निकोलस पुरनने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेत सामना बॉल टू रन इथपर्यंत आणला. 19 चेंडूत 62 धावांच्या खेळीमध्ये पुरनने सात षटकार आणि चार चौकार ठोकले. मोहम्मद सिराजने त्याला कॅच आऊट केलं. त्यानंतर तळाच्या खेळाडूंनी सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला.

लखनऊ प्लेइंग इलेव्हन लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | के एल राहुल (कॅप्टन), कायले मेयर्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), दीपक हुडा, मार्क्स स्टॉयनिस, कृणाल पंड्या, अमित मिश्रा, रवी बिश्नोई, ए खान, जयदेव उनाडकट आणि मार्क वुड.

आरसीबी प्लेइंग इलेव्हन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), एस अहमद, ए रावत, एच पटेल, डेव्हिड विली, मोहम्मद सिराज आणि वेन पारनेल.

Follow Us
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?