AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बडे दिलवाला, एका रात्रीत जय शाह यांनी पिच क्युरेटर आणि ग्राऊंड्समनना केलं मालामाल

आयपीएल 2024 चा हंगाम केकेआरने आपल्या नावावार केलाय. या हंमामत हैदरबाद संघ तगडा वाटत होता मात्र शेवटच्या सामन्यात त्यांची फलंदाजी ढेपाळली. केकेआरने संधीचा फायदा घेतला. आयपीएल संपल्यानंतर जय शाह यांनी मोठी घोषणा केली आहे.

बडे दिलवाला, एका रात्रीत जय शाह यांनी पिच क्युरेटर आणि ग्राऊंड्समनना केलं मालामाल
| Updated on: May 27, 2024 | 4:42 PM
Share

क्रिकेटची कोणतीही स्पर्धा यशस्वी होण्यामागे ग्राऊंड्समन आणि पिच क्युरेटर्स यांची मोठी भूमिका असते. आता आयपीएलचा 17 वा सीझन पार पडला असून केकेआर संघाने फायनल जिंकत तिसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरलं. ऊन, पाऊस आणि हवामानाचा सामना करत ते पिच चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. पडद्यामागचे कलाकार म्हणून त्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. याच पार्श्वभूमीवर यंदाची आयपीएल संपल्यावर खेळाडूंवर जसा पैशांचा पाऊस पडला आहे. तसाच आता या मेहनती ग्राऊंड्समन आणि पिच क्युरेटर्ससाठी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मोठी घोषणा केली आहे.

आपली लीग यशस्वी होण्यामाग पडद्यामागचा खरा नायक ग्राऊंड स्टाफ आहे. ज्यांनी अगदी कठीण परिस्थितीमध्ये चांगले पिच होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. आयपीएलच्या 10  होम टीमच्या ग्राऊंड्समन आणि पिच क्यूरेटर यांनी प्रत्येकी 25 लाख आणि अतिरिक्त तीन ठिकाणांवरील प्रत्येकाला 10 लाख रूपये देण्यात येणार आहेत. तुम्ही घेतलेल्या मेहनतीसाठी तुमचे मनापासून धन्यवाद, असं जय शाह यांनी म्हटलं आहे.

आयपीएल सुरू असताना अनेकदा पावसाने खोडा घातला, काही सामने पावसामुळे रद्द करावे लागले. मात्र पाऊस पडून गेल्यावर सामना सुरू करण्यासाठी ग्राऊंड्सन आपली सर्व ताकद लावून काम करत होते. सामना चालू होण्यासाठी त्यांची धडपड सर्व जग पाहत होतं. सामना चालू झाल्यावर सगळे सामन्याचा आनंद घेण्यात गुंग होतात, पण घामाने ओले चिंब झालेल्या या ग्राऊंड्समनकडे कोणाची नजर जात नाही. पण बीसीसीयआयने त्यांच्या कष्टाची दखल घेतली.

दरम्यान, यंदाच्या आयपीएल सीझनचा फायनल सामना चेपॉक स्टेडियमवर पार पडला. या सामन्यामध्ये केकेआर आणि हैदराबाद दोन संघ भिडले.  संपूर्ण लीगमध्ये आपली एकहाती सत्ता असल्यासारखं बॅटींग प्रदर्शन करणारा हैदराबादचा संघ शेवटच्या सामन्यात मात्र ढेपाळलेला पाहायला मिळाला.  18.3 ओव्हरमध्ये 113  धावा केल्या होत्या. या छोट्या लक्षाचा पाठलाग करणाऱ्या केकेआरने अवघ्या दीड तासांच्या आतमध्ये सामना आठ विकेटने जिंकला. या सामन्यामध्ये सामनावीर म्हणून मिचेल स्टार्क याला गौरवण्यात आलं.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.