DC vs MI Confirmed Playing XI, IPL 2024 : दिल्ली विरुद्ध मुंबईत 1 बदल, विकेट टेकर बॉलर ‘आऊट’

| Updated on: Apr 27, 2024 | 3:38 PM

Delhi Capitals vs Mumbai Indians Confirmed Playing XI in Marathi : मुंबई इंडियन्सला मोठा झटका लागला आहे. मुंबईचा विकेट टेकर गोलंदाजाला पोटाच्या त्रासामुळे दिल्ली विरुद्धच्या सामन्याला मुकावं लागलं आहे.

DC vs MI Confirmed Playing XI, IPL 2024 : दिल्ली विरुद्ध मुंबईत 1 बदल, विकेट टेकर बॉलर आऊट
mumbai indians huddle talk,
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 42 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. हा सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 3 वाजता टॉस झाला. दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंतने टॉस उडवला. मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंडयाने टॉस जिंकला. हार्दिकने फिल्डिंगचा निर्णय घेत चेसिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दिल्ली पहिले बॅटिंग करताना किती धावांचं आव्हान देणार? याकडे मुंबईच्या चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

मुंबई आणि दिल्ली या दोन्ही संघांनी या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. दोघांनी प्रत्येकी 1 बदल केला आहे. दिल्लीचा ओपनर पृथ्वी शॉ याला बाहेर बसवलं आहे.तर त्याच्या जागी कुमार कुशाग्रा याला संधी देण्यात आली आहे. कुमारचं हे दिल्लीसाठी पदार्पण ठरलं. तर दुसऱ्या बाजूला मुंबईसाठी या 17 व्या हंगामात दुसऱ्या सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज जेराल्ड कोएत्झी हा प्लेईंग ईलेव्हनमधून बाहेर आहे. जेराल्डला पोटाच्या त्रासमुळे या सामन्याला मुकावं लागलं आहे. त्यामुळे त्याच्या जागी मुंबईच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये ल्यूक वूड याला संधी देण्यात आली आहे.

जेराल्ड कोएत्झी हा मुंबईसाठी या हंगामात जस्प्रीत बुमराह याच्यानंतर सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज आहे. जेराल्डने या हंगामातील 8 सामन्यात 288 धावांच्या मोबदल्यात 12 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 34 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स ही जेराल्डची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. तर बुमराहने मुंबईसाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्यात. बुमराहच्या नावे 8 सामन्यात 13 विकेट्स आहेत.

मुंबई आणि दिल्ली प्लेईंग ईलेव्हन

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), जेक फ्रेझर-मॅकगर्क, कुमार कुशाग्रा, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, लिझाद विल्यम्स, मुकेश कुमार आणि खलील अहमद.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, पीयूष चावला, ल्यूक वुड, जसप्रीत बुमराह आणि नुवान तुषारा.