RR vs MI Confirmed Playing XI, IPL 2024 : मुंबईत 3 बदल, कुणाला डच्चू?

| Updated on: Apr 22, 2024 | 8:04 PM

Rajasthan Royals vs Mumbai Indians Confirmed Playing XI in Marathi : हार्दिक पंड्या याने राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग ईलेव्हमध्ये तब्बल 3 बदल केले आहेत.

RR vs MI Confirmed Playing XI, IPL 2024 : मुंबईत 3 बदल, कुणाला डच्चू?
mumbai indians mi ipl 2024,
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

आयपीएलच्या 17 व्या मोसमात मुंबई इंडियन्सने 38 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध सवाई मानसिंह स्टेडियम येथे टॉस जिंकला आहे. मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्या याने पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे होम टीम राजस्थान रॉयल्स संजू सॅमसन याच्या नेतृत्वात पहिले फिल्डिंग करणार आहे. राजस्थान रॉयल्सचा आपल्या घरच्या मैदानात पाहुण्या मुंबईला कमी धावसंख्येवर रोखण्यााठी प्रयत्न करणार आहेत. तर मुंबईचा मोठी धावसंख्या करण्याचा प्रयत्न असणार आहे. आता या प्रयत्नात नक्की कोण यशस्वी ठरणार हे पहिल्या डावानंतरच समजेल. मात्र त्याआधी दोन्ही संघाच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये केलेल्या बदलांबद्दल आपण जाणून घेऊयात.

मुंबईच्या संघात 3 बदल

मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्या याने प्लेईंग ईलेव्हनमध्ये तब्बल 3 बदल केले आहेत. आकाश मधवाल, रोमारियो शेफर्ड आणि श्रेयस गोपाळ या तिघांच्या जागी नुवान तुषारा, नेहल वढेरा आणि पीयूष चावला या तिघांना संधी देण्यात आली. तर संजू सॅमसनने राजस्थानच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. संदीप शर्मा याची एन्ट्री झाली आहे. संदीपला कुलदीप सेन याच्या जागी संधी देण्यात आली आहे.

आकडेवारी कुणाच्या बाजूने?

मुंबई आयपीएच्या इतिहासात राजस्थान रॉयल्सवर वरचढ राहिली आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात आतापर्यंत एकूण 29 सामने झाले आहेत. मुंबईने या 29 पैकी 15 सामने जिंकले आहेत. तर राजस्थान रॉयल्सने 13 वेळा विजय मिळवला आहे. मुंबईने जयपूरमध्ये अखेरचा विजय हा आजपासून 12 वर्षांपूर्वी 2012 साली मिळवला होता. तेव्हापासून मुंबईला तिथे विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे मुंबईचा जयपूरमध्ये विजय मिळवून इतिहास बदलण्याचा प्रयत्न असणार आहे.

मुंबई आणि राजस्थानची प्लेईंग ईलेव्हन

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा आणि युझवेंद्र चहल.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला आणि जसप्रीत बुमराह.