AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024, DC vs CSK : दिल्ली कॅपिटल्सने फोडला विजयाचा नारळ, चेन्नई सुपर किंग्सवर मिळवला 20 धावांनी विजय

आयपीएल स्पर्धेतील 13 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ भिडले. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सला धावांनी नमवलं. तसेच दिल्लीची गाडी विजयाच्या ट्रॅकवर उतरली आहे. या विजयासह गुणातालिकेत फायदा झाला आहे.

IPL 2024, DC vs CSK : दिल्ली कॅपिटल्सने फोडला विजयाचा नारळ, चेन्नई सुपर किंग्सवर मिळवला 20 धावांनी विजय
| Updated on: Mar 31, 2024 | 11:27 PM
Share

सलग दोन पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सने तिसऱ्या सामन्यात विजयाचा नारळ फोडला आहे. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच 20 षटकात 5 गडी गमवून 191 धावा केल्या आणि विजयासाठी 192 धावांचं आव्हान दिलं. चेन्नई सुपर किंग्सला हे आव्हान पेलता आलं नाही. चेन्नई सुपर किंग्सने 6 गडी गमवून 171 धावा करता आल्या. विजयी आव्हान गाठताना चेन्नई सुपर किंग्सचा डाव अडखळला. मोक्याच्या क्षणी विकेट्स गमवल्याने फटका बसला. अजिंक्य रहाणेने संघासाठी बऱ्यापैकी संघर्ष केला. मात्र मुकेश कुमारने अजिंक्य रहाणनेला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर आलेल्या समीर रिझवीलाही बाद केलं. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचं चेंडू आणि धावांमधील अंतर वाढत गेलं. महेंद्रसिंह धोनी 16 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकाराच्या मदतीने नाबाद 37 धावा केल्या. पण विजय मिळवून देण्यात अपयश आलं. अखेर दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सला 171 धावांवर रोखलं आणि विजय मिळवला.

चेन्नई सुपर किंग्सचा डाव

दिल्ली कॅपिटल्सने विजयासाठी दिलेल्या 192 धावांचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात अडखळत झाली. कर्णधार ऋतुराज गायकवाड स्वस्तात बाद झाला. अवघी 1 धाव करून तंबूत परतला. त्या पाठोबात रचिन रविंद्रही 2 धावा करत बाद झाला. डेरील मिचेलही काही खास करू शकला ना 26 चेंडूत 34 धावा केल्या आणि बाद झाला. मात्र अजिंक्य रहाणे एका बाजूने किल्ला लढवत राहिला. पण मुकेश कुमारच्या षटकात बाद होत तंबूत परतला. त्याने 30 चेंडूत 45 धावा केल्या. लगेचच दुसऱ्या चेंडूवर समीर रिझवी बाद होत तंबूत परतल्याने संघ बॅकफूटवर गेला. शिवम दुबेकडून अपेक्षा होत्या मात्र तोही काही खास करू शकला नाही. 18 धावा करून बाद झाला.

दिल्ली कॅपिटल्सचा डाव

दिल्ली कॅपिटल्सकडून पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर ही जोडी फलंदाजीसाठी आली. या जोडीने 93 धावांची भागीदारी केली. डेविड वॉर्नर 35 चेंडूत 52 धावा केल्या. तर पृथ्वी शॉ 27 चेंडूत 43 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर आलेल्या कर्णधार ऋषभ पंतने सुरुवातीला सावध खेळी केली. तसेच शेवटी आक्रमकता दाखवत 32 चेंडूत 51 धावांची खेळी केली. यात त्याने 4 चौकार आणि 3 षटकार मारले. पण मथीशा पथिरानाने एकाच षटकात सलग दोन गडी बाद करत दिल्लीला धक्का दिला. त्यामुळे दिल्लीचा डाव अडखळला. अक्षर पटेल नाबाद 7 आणि अभिषेक पोरेल नाबाद 9 धावांवर राहिला. मथीशा पथिरानाने 4 षटकात 31 धावा देत 3 गडी बाद केले. तर रविंद्र जडेजा आणि मुस्तफिझुर रहमानने प्रत्येकी एक गडी बाद केला.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मथीशा पाथिराना, मुस्तफिजुर रहमान.

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, एनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद.

भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?
भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?.
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?.
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर.
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी.
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं.
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका.
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.