AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK vs RCB : क्रिकेट स्पर्धेत नेट रनरेटचं गणित कसं ठरतं? जाणून घ्या एका क्लिकवर

आयपीएल 2024 स्पर्धेतील प्लेऑफच्या चौथ्या स्थानासाठी लढत रंगतदार वळणावर आली आहे. चेन्नई सुपर किंग्स विजयानंतर सहजपणे प्लेऑफ गाठेल. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं गणित विजयासोबत नेट रनरेटवर अवलंबून आहे. चला जाणून घेऊयात नेमका हा नेट रनरेट काढतात तरी कसा

CSK vs RCB : क्रिकेट स्पर्धेत नेट रनरेटचं गणित कसं ठरतं? जाणून घ्या एका क्लिकवर
CSK vs RCB : नेट रनरेट अखेर कसा ठरवला जातो? त्यामागे कोणता फॉर्म्युला आहे ते समजून घ्या
| Updated on: May 18, 2024 | 6:10 PM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेतील अत्यंत महत्त्वाचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होत आहे. या सामन्यातील विजय आणि नेट रनरेट प्लेऑफचं गणित ठरवणार आहे. त्यामुळे नेट रनरेटबाबत प्रचंड उत्सुकता आहे. कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने चेन्नई सुपर किंग्स विरुद्धचा सामना जिंकला तर दोघांचे 14 गुण होतील. त्यामुळे प्लेऑफचं गणित हे नेट रनरेटवर ठरवलं जाईल. चेन्नई सुपर किंग्स 14 गुण आणि 0.+528 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 12 गुण आणि +0.387 नेट रनरेटसह सातव्या स्थानावर आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला फक्त विजय मिळवून चालणार नाही. चेन्नई सुपर किंग्सला 18 धावा किंवा 11 चेंडू राखून जिंकावं लागेल. पण हे सर्व नेमकं ठरतं तरी कसं? नेट रनरेट कसा काढला जातो असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. तर चला तर अगदी सोप्या भाषेत हे गणित समजून घेऊयात

नेट रनरेट काढण्यासाठी संघाने किती षटकात किती धावा केल्या आणि विरोधी संघाने किती षटकात त्या धावा केल्या हे पाहिलं जातं. म्हणजेच (एकूण धावा/एकूण षटकं-विरोधी संगाच्या धावा/एकूण षटकं) असं गणित आहे. आकडेवारीतून हे गणित समजून घेऊयात. एका संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 140 धाव केल्या (140/20) आणि प्रतिस्पर्धी संघाने 20 षटकात 130 धावा केल्या. तर फलंदाजी करणाऱ्या संघाचा नेट रनरेट हा (7-6.5)= +0.5 इतका असेल. पराभूत झालेल्या संघाचा नेट रनरेट हा -0.5 इतका असेल. दुसरं उदाहरण द्यायचं तर, दुसऱ्या संघाने 20 षटकात 139 धावा केल्या आणि सामना एका धावेने गमवाला. तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा नेट रनरेट हा +0.05 इतका असेल. तर प्रतिस्पर्धी संघाचा नेट रनरेट हा -0.05 इतका असेल.

प्रत्येक सामन्यानंतर नेट रनरेट हा खाली वर होत असतो. सध्याच्या नेट रनरेटमध्ये त्या सामन्याचा नेट रनरेट अधिक वजा केला जातो आणि ठरवलं जातं. सध्याचं गणित पाहता चेन्नई सुपर किंग्सचा नेट रनरेट 0.+528 हा आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा नेट रनरेट हा +0.387 इतका आहे. त्यामुळे आरसीबीला सामना जिंकून चेन्नईच्या पुढे जायचं तर हा सामना 18 धावांनी किंवा 11 चेंडू राखून जिंकावा लागेल. तर प्लेऑफचं तिकीट मिळेल.

चेन्नई सुपर किंग्सने आरसीबीला पहिल्या सामन्यात 6 विकेट्स आणि 8 चेंडू राखून पराभूत केलं होतं. आरसीबीने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 173 धावा केल्या होत्या. तर हे आव्हान चेन्नई सुपर किंग्सने 18.4 षटकात पूर्ण केलं होतं. पहिल्या सामन्यातील नेट रनरेट काढायचा तर (आरसीबीच्या 173/20=8.65) (चेन्नई सुपर किंग्सच्या 176/18.4=9.56 ) चेन्नई सुपर किंग्सचा +0.91 इतका नेट रनरेट होता. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा नेट रनरेट हा -0.91 इतका होता.

Follow Us
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; चक्क...
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; पंतप्रधान, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोसह चक्क...
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच नगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा...
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा वेडा... भाजप नेत्याचं विधान तुफान चर्चेत
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश राज ठाकरेंच्या भेटीला
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश कावरे तातडीने राज ठाकरेंच्या भेटीला, या बैठकीत...
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही बंड करणार?
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही पक्षाला पाठ फिरवणार? व्हिडीओ समोर येताच मोठी खळबळ
प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात वंदे मातरम् प्रकरणी नव्या वादाची शक्यता
प्रणिती शिंदे यांच्या सोलापूरमधील कार्यक्रमात वंदे मातरम् अपूर्ण गायल्याने नवा वाद
राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाची नोटीस, संजय राऊत संतापलेच; थेट...
Sanjay Raut | राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाची नोटीस, संजय राऊत संतापलेच; थेट म्हणाले...
प्रकृती अस्वस्थ असानाही मनोज जरांगेचा मोठा निर्णय! रुग्णालयातू...
प्रकृती अस्वस्थ असानाही मनोज जरांगेचा मोठा निर्णय! रुग्णालयातून तात्पुरता डिस्चार्ज घेऊन थेट...
एकच खळबळ! TMC कार्यालयातच... ममता बॅनर्जी विश्वासू नेत्याने
एकच खळबळ! TMC कार्यालयातच... ममता बॅनर्जी विश्वासू नेत्याचा संशयास्पद मृत्यु, नेमकं काय घडलं?
महायुतीतील नेत्याला केंद्राकडून मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
महायुतीतील नेत्याला केंद्राकडून मोठं गिफ्ट; थेट या पदावर... पक्षाने दिली राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारी
ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह? बुलढाणा असेल बालेकिल्ला अन् तब्बल...
ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह! बुलढाणा असेल बालेकिल्ला अन् तब्बल... शिवसेनेच्या कोर्टातील निकालाआधीच मोठा बॉम्ब