
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 35 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने असणार आहेत. ऋषभ पंत दिल्ली कॅपिट्ल्सचं नेतृत्व करणार आहे. तर पॅट कमिन्स याच्याकडे सनरायजर्स हैदराबादची धुरा असणार आहे. दिल्लीचा हा आठवा आणि हैदराबादचा सातवा सामना असणार आहे. दिल्लीने आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यांपैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 4 सामने गमावले आहेत. तर दुसऱ्या बाजूला हैदराबादने 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर 2 सामन्यात पराभव झाला आहे. सनरायजर्स हैदराबाद पॉइंट्स टेबलमध्ये 4 विजय आणि 8 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. तर दिल्ली 3 विजय 6 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे.
दिल्ली विरुद्ध हैदराबाद सामना 20 एप्रिल रोजी होणार आहे.
दिल्ली विरुद्ध हैदराबाद सामना अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली येथे होणार आहे.
दिल्ली विरुद्ध हैदराबाद सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
दिल्ली विरुद्ध हैदराबाद सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.
दिल्ली विरुद्ध हैदराबाद सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपद्वारे फुकटात पाहायला मिळेल.
दिल्ली कॅपिटल्स टीम : ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, अभिषेक पोरेल, रिकी भुई, यश धुल, शाई होप, पृथ्वी शॉ, ट्रिस्टन स्टब्स, कुमार कुशाग्रा, स्वस्तिक चिकारा, इशांत शर्मा, झ्ये रिचर्डसन, रसिक दार सलाम, विकी ओस्तवाल, एनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, खलील अहमद, सुमित कुमार, अक्षर पटेल, मिचेल मार्श, ललित यादव आणि जेक फ्रेझर-मॅकगर्क.
सनराजयर्स हैदराबाद टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), जयदेव उनाडकट, झटावेध सुब्रमण्यन, टी नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, ग्लेन फिलिप्स, नितीश रेड्डी, मार्को जॅनसेन, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, उपेंद्र यादव. , एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, अनमोलप्रीत सिंग, मयंक अग्रवाल, अब्दुल समद, आकाश महाराज सिंग, वानिंदू हसरंगा आणि उमरान मलिक.