AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 Final, KKR vs SRH : पहिल्याच षटकात मिचेल स्टार्ककडून 24.75 कोटी रुपये वसूल, हेड भीतीने नॉन स्ट्राईकला

आयपीएल 2024 स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात नाणफेकीचा कौल जिंकत हैदराबादने फलंदाजी घेतली. पण पहिल्या षटकापासून फलंदाजांनी धास्ती घेतल्याचं दिसलं. ट्रेव्हिस हेडने तर नॉन स्ट्राईकला राहणं पसंत केलं.

IPL 2024 Final, KKR vs SRH : पहिल्याच षटकात मिचेल स्टार्ककडून 24.75 कोटी रुपये वसूल, हेड भीतीने नॉन स्ट्राईकला
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 26, 2024 | 7:58 PM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी झालेल्या लिलावात सर्वात महागडा खेळाडू म्हणून मिचेल स्टार्कची बोली लागली. कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटी खर्च करून त्याला आपल्या संघात सहभागी करून घेतलं. आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू म्हणून त्याची जोरदार चर्चाही रंगली. मात्र आयपीएलच्या सुरुवातीला त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे 24.75 कोटी पाण्यात गेले अशी चर्चा रंगली होती. मात्र प्लेऑफच्या सामन्यात या महागड्या खेळाडूने अनुभव काय असतो हे दाखवून दिलं आहे. सनरायझर्स हैदराबादने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. मोठी धावसंख्या उभारणार असं सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स याने सांगितलं. मात्र सनरायझर्स हैदराबाद पहिल्याच षटकात बॅकफूटला गेल्याचं दिसलं. प्रत्येक सामन्यात स्ट्राईक घेणारा ट्रेव्हिस हेडने नॉन स्ट्राईकला राहणं पसंत केलं. कारण समोर मिचेल स्टार्क असल्याने त्याला धास्ती होती. दुसरीकडे, अभिषेक शर्मा त्याच्या गोलंदाजीचा सामना करताना चाचपडताना दिसला. चार षटकं सावधपणे खेळल्यानंतप पाचव्या चेंडूवर त्याचा दांडका उडवला. त्याला फक्त 2 धावा करता आल्या.

दुसरीकडे, मिचेल स्टार्क घाबरून मागे सरकलेल्या हेडला वैभव अरोराने दणका दिला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही वैभव अरोराच्या गोलंदाजीव त्याला बाद होत तंबूत परतावं लागलं. त्यामुळे क्वॉलिफायर 1 मध्ये कोलकात्याने दाखवलेला रंग तसाच असल्याचं दिसून आलं. आघाडीचे आक्रमक फलंदाज झटपट बाद झाल्याने मधल्या फळीवर दडपण वाढलं आहे. हैदराबादच्या चारचाकी गाडीचं पहिल्या चाकामधील हवा काढल्याची क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. त्यानंतर श्रेयस अय्यरने संघाचं पाचवं आणि त्याचं वैयक्तिक तिसरं षटक स्टार्कला सोपवलं. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर स्टार्कने राहुल त्रिपाठीला तंबूचा रस्ता दाखवला. त्याला 13 चेंडूत फक्त 9 धावा करता आल्या. रमनदीप सिंगने त्याचा जबरदस्त झेल घेतला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

कोलकाता नाईट रायडर्स इम्पॅक्ट प्लेयर्स: अनुकुल रॉय, मनीष पांडे, नितीश राणा, केएस भरत, शेरफेन रदरफोर्ड

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.

सनरायझर्स हैदराबाद इम्पॅक्ट प्लेयर्स: उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, मयंक मार्कंडे, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....