KKR vs SRH: “इतका वेळ तर…”, कॅप्टन श्रेयस अय्यर केकेआरच्या विजयानंतरही असं का म्हणाला?

Shreyas Iyer KKR vs SRH Final Ipl 2024 : कोलकाताने आयपीएलचं तिसरं विजेतेपद पटकावल्यानंतर कॅप्टन श्रेयस अय्यर याने जाहीर सर्वांसमोर नाराजी व्यक्त केली. श्रेयसने कशासाठी प्रतिक्षा करावी लागली? हे सांगितलं.

KKR vs SRH: इतका वेळ तर..., कॅप्टन श्रेयस अय्यर केकेआरच्या विजयानंतरही असं का म्हणाला?
shreyas iyer kkr captain
Image Credit source: BCCI/IPL
| Updated on: May 27, 2024 | 2:04 AM

कोलकाता नाईट रायडर्स चेन्नईतील चेपॉक या स्टेडियममध्ये तिसऱ्यांदा आयपीएलचा खिताब जिंकण्यात यशस्वी ठरली. श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात कोलकाता पहिल्यांदा आणि चेपॉकमध्ये एकूण दुसऱ्यांदा आणि इतिहासात तिसऱ्यांदा केकेआर ट्रॉफी उंचावण्यात यशस्वी ठरली. केकेआर आयपीएलमध्ये सर्वाधिक ट्रॉफी जिंकणारी तिसरी टीम ठरली. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांनी प्रत्येकी 5-5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. कोलकाताने चेन्नईतील एमए चिंदबरम स्टेडियममध्ये सनरायडर्स हैदराबादवर 8 विकेट्सने विजय मिळवला. केकेआरच्या गोलंदाजांनी आधी हैदराबादला 113 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर केकेआरने हे आव्हान 2 विकेट्सच्या मोबदल्यात 11 व्या ओव्हरमध्ये विजयी आव्हान पूर्ण केलं.

श्रेयस अय्यर काय म्हणाला?

श्रेयस अय्यरने सामन्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनदरम्यान जोरदार ट्रोलिंग केलं. केकेआरने सामना जिंकल्यानंतर जवळपास 2 तासांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर कॅप्टन श्रेयसला ट्रॉफी उंचावता आली. यावरुन कॅप्टन श्रेयसने बेधडक प्रतिक्रिया दिली. इतका वेळ तर सामनाही चालला नाही, जितका वेळ प्रेझेंटेशनला सुरुवात करायला लागल्याचं श्रेयसने स्पष्ट केलं.

“पूर्णपणे सर्वसमावेशक असा विजय होता. आम्हाला टीम आणि प्रत्येक खेळाडूकडून अशीच अपेक्षा होती. सर्व योग्य प्रसंगी उभे राहिले. भावना व्यक्त करणं फार कठीण आहे. प्रतिक्षा करणं फार वेळखाऊ होतं. इतका वेळ तर सामन्यालाही लागला नाही.”, असं श्रेयसने म्हटलं. तसेच संपूर्ण हंगामात आम्ही अजिंक्य खेळाडूंसारखे खेळलो. हे आनंददायी आहे, संपूर्ण कामगिरी निर्दोष आहे. पहिल्या सामन्यापासून आम्ही जबरदस्त खेळलो, आज आम्ही पुढे आलो”, असंही श्रेयसने आवर्जून स्पष्ट केलं.

केकेआरचा चेन्नईत विजयी जल्लोष

कोलकाता नाइट राइडर्स प्लेइंग ईलेव्हन: श्रेयस अय्यर (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज़ (विकेटकीपर), सुनील नरीन, वेंकटेश अय्यर, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह, मिचेल स्टार्क, वैभव अरोडा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.

सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन: पॅट कमिन्स (कॅर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनादकट आणि टी नटराजन.